
भाजप नेते किरीट सोमय्या यांच्या गाडीवर शिवसैनिकांनी हल्ला केला आहे.
शिवसैनिकांचा किरीट सोमय्यांवर हल्ला, झेड सुरक्षेतून दगड थेट गाडीत
भाजपचे नेते मोहित कंबोज (Mohit Kamboj) यांच्या गाडीवर हल्ला झाल्याची घटना ताजी असतानाच भाजपचे नेते किरीट सोमय्या (Kirit Somaiya) यांच्या गाडीवर शिवसैनिकांनी जोरदार दगडफेक केल्याची घटना समोर आलीय. तर, सोमय्यांनीच आमच्या अंगावर गाडी चढवली असा आरोप शिवसैनिकांनी केलाय.
किरीट सोमय्या आज रात्री खासदार नवनीत राणा आणि रवी राणा यांची भेट घेण्यासाठी खार पोलीस स्टेशनला गेले होते. यावेळी किरीट सोमय्या यांना शिवसैनिकांच्या रोषाला सामोरं जावं लागलंय. किरीट सोमय्या परत जात असताना खार पोलीस स्टेशनबाहेर त्यांच्या गाडीवर शिवसैनिकांनी दगड फेकल्याचे समोर आलंय.
हेही वाचा: 'शिवरायाचं राज्य प्रत्येकाच्या मनात आहे, हे कुणी सांगायची गरज नाही'
सोमय्या यांच्या गाडीची काच फोडण्यात आल्याची माहिती समोर आलीय. किरीट सोमय्या या हल्ल्यात जखमी झाल्याची माहिती समोर येत आहे. तर सोमय्या यांनीच आमच्या अंगावर गाडी चढवली होती, असा दावा शिवसैनिकांनी केलाय.
Web Title: Shiv Sainiks Attacked Bjp Leader Kirit Somaiya Car
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..