Jayant Patil: शिंदेंचे 16 आमदार अपात्र ठरतील उरलेले परत ठाकरेंसोबत जातील; जयंत पाटलांना विश्वास

सुप्रीम कोर्टानं आमदार अपात्रतेचा मुद्दा विधानसभा अध्यक्षांच्या कोर्टात टाकल्यानंतर जयंत पाटलांनी यावर भाष्य केलं आहे.
jayant Patil
jayant Patil
Updated on

मुंबई : राज्यातील सत्तासंघर्षाच्या प्रकरणावर सुनावणी करताना सुप्रीम कोर्टानं स्पष्टपणे निकाल दिला नाही. तर तो विधानसभा अध्यक्षांच्या कोर्टात टाकला. पण आता विधानसभा अध्यक्षांपुढे निर्णय घेताना काय परिस्थिती असेल यावर अनेक मतमतांतर दिसून येत आहेत. यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी यांनी भाष्य केलं आहे. शिवसेनेचे १६ आमदार अपात्र ठरतील तसेच उर्वरित २४ आमदार भाजपत जातील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे. (Shiv Sena 16 MLAs will be disqualified rest will go with Thackeray says Jayant Patil)

जयंत पाटील म्हणाले, "मला वाटतं की १६ आमदार अपात्र ठरतील. त्यानंतर शिंदे-फडणवीस सरकार निश्चितच कोसळेल. तसेच शिंदे गटाचे उरलेले आमदार हे कदाचित पुन्हा उद्धव ठाकरेंच्या गटात पुन्हा जातील. तसेच संख्येनुसार भाजप हा सर्वात मोठा पक्ष ठरेल त्यानंतर राज्यपाल त्यांना सत्ता स्थापनेचं निमंत्रण देतील. त्यानंतर जर त्यांच्याकडं पुरेसा आकडा असेल तर ते सत्ता स्थापन करतील"

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

MLA Kailas Patil's Demand Accepted; Government Assures Unconditional MGNREGA Subsidy
Shivaji Patil supports Shaktipeeth Highway project
Shashikant Shinde Jayant Patil on sharad pawar
Jayant Patil latest political statement
Marathi News Esakal
www.esakal.com