शिवसेना-भाजपकडून अपक्षांची जुळवाजुळव 

shivsena-bjp
shivsena-bjp

भाजपचे संख्याबळ 112; शिवसेना 62 वर 
मुंबई - मुख्यमंत्रिपदावरून एकमेकांवर कुरघोडी करणाऱ्या शिवसेना-भाजपने अपक्षांना आपल्याकडे ओढण्यास सुरवात केली आहे. धुळे जिल्ह्यातील साक्रीच्या अपक्ष आमदार मंजुळा गावित यांनी "मातोश्री' येथे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेऊन शिवसेनेला पाठिंबा दिला. त्यामुळे शिवसेनेचे संख्याबळ वाढून 62 वर गेले असून, भाजपकडे 112 आमदार आहेत. 

भाजपच्या विधिमंडळ नेतेपदी देवेंद्र फडणवीस यांची निवड झाली असताना मुख्यमंत्रिपदावर दावा करणाऱ्या शिवसेनेचे संख्याबळ वाढले आहे. "फिफ्टी-फिफ्टी' फॉर्म्युल्यावरून भाजप-शिवसेनेत जोरदार रस्सीखेच सुरू आहे. विधानसभा निवडणुकीचा निकाल लागून आठवडा होत आला तरी, या दोन्ही पक्षांची एकही संयुक्त बैठक झालेली नाही. दोन्ही पक्षांकडून अपक्ष आमदारांना खेचण्याचे जोरदार प्रयत्न सुरू आहेत. 

भाजपने अपक्षांप्रमाणे बंडखोर आमदारांसाठीही दरवाजे उघडले असून, आतापर्यंत रवी राणा, गीता जैन, राजेंद्र राऊत, महेश बालदी, विनोद अग्रवाल, विनय कोरे आणि किशोर जोगरेवाल या सात आमदारांना खेचण्यात यश मिळवले आहे. परिणामी, भाजपचे संख्याबळ वाढून 112 वर पोचले आहे. त्याचप्रमाणे प्रहार जनशक्ती पक्षाचे बच्चू कडू, राजकुमार पटेल यांच्यासह शंकरराव गडाख, आशिष जैस्वाल, नरेंद्र भोंडेकर यांनी शिवसेनेला पाठिंबा जाहीर केला आहे. 

समान पदांच्या मुद्द्यावर अद्याप तोडगा निघाला नसला तरी, शिवसेना आणि भाजप यांनी अपक्षांच्या मदतीने आपापले संख्याबळ वाढवण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. त्यात दोन्ही पक्षांकडून कुरघोडीचे राजकरण केले जात आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com