Shiv Sena Case: ...तर यत्र तत्र सर्वत्र भक्तांना दिसतील नरहरी झिरवळ; अंधारेंचं खोचक ट्विट

Shiv Sena Case
Shiv Sena Caseesakal
Updated on

SC Final Decision Shiv Sena Controversy: महाराष्ट्रातील सत्तासंघर्षासंदर्भात सुप्रीम कोर्टाने राखून ठेवलेला निकाल आज जाहीर होणार आहे. दरम्यान, विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवळ नॉट रीचेबल असल्याच्या चर्चेला उधाण आलं होत मात्र ते एका कार्यक्रमात असल्याचे सांगितले जाते. या चर्चेनंतर शिवसेनेच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी एक ट्विट करत सर्वांचे लक्ष वेधले आहे.

अंधारे यांनी शेलक्या भाषेत भाजपवर निशाना साधला आहे. त्यांनी ट्विटमध्ये म्हटलं आहे की, "जर असेल तुमच अंतकरण निर्मळ तर यत्र तत्र सर्वत्र भक्तांना दिसतील नरहरी झिरवळ" मात्र झिरवळ सकाळ पासून नॉट रीचेबल असल्याचे सांगितले जात होते.

Shiv Sena Case
SC Decision on Shiv Sena: सत्तासंघर्षाचा निकाल शिंदे गटाच्या बाजूने लागला तर...; वाचा तज्ञ काय म्हणतात

दरम्यान महाराष्ट्रातील सत्तासंघर्षाचा युक्तीवाद तब्बल 9 महिन्यांनंतर पुर्ण झाल्यानंतर 11महिन्यांनी निकाल जाहिर होणार आहे. ठाकरे गट आणि शिंदे गटाकडून जोरदार युक्तीवाद करण्यात आला होता. ठाकरे गटाकडून कपिल सिब्बल, अभिषेक मनुसिंघवी आणि देवदत्त कामतांनी युक्तिवाद केला. तर शिंदे गटाकडून हरिश साळवे, महेश जेठमलानी, नीरज कौल यांनी युक्तिवाद केला.

सर्वोच्च न्यायालयाच्या पाच न्यायाधीशांच्या घटनापीठाने महाराष्ट्रातील राजकीय सत्तासंघर्षाचा निकाल राखून ठेवला होता. हा निकाल सरन्यायाधीश डीवाय चंद्रचूड, न्यायमूर्ती एमआर शाह, न्यायमूर्ती कृष्णा मुरारी, न्यायमूर्ती हिमा कोहली आणि न्यायमूर्ती पीएस नरसिम्हा हे पाच सदस्यांची घटनापीठ निर्णय देणार आहे. या खंडपीठातील दुसऱ्या क्रमांकाचे ज्येष्ठ न्यायमूर्ती एमआर शाह हे १५ मे रोजी निवृत्त होत आहेत.

Shiv Sena Case
सत्तासंघर्षाचा निकाल ठाकरे गटाच्या बाजूने लागला तर काय घडेल? वाचा तज्ञ काय म्हणतात supreme court

सत्तासंघर्षावरील निकाल एकमताने येण्याची शक्यता आहे. हा निकाल फक्त सरन्यायाधीश वाचून दाखवणार आहेत. त्यामुळे दोन वेगळ्या निकालांची किंवा घटनापीठात मतभेदांची शक्यता कमी आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com