esakal | ऐन कोरोना काळात मुंबई पालिका आयुक्त परदेशी का बदलले ते सांगा - नितेश राणे
sakal

बोलून बातमी शोधा

Nitesh Rane

ऐन कोरोना काळात मुंबई पालिका आयुक्त परदेशी का बदलले ते सांगा - नितेश राणे

sakal_logo
By
दीनानाथ परब

मुंबई: गुजरातमध्ये भाजपाने मोठा फेरबदल केला आहे. विजय रुपानी (vijay rupani) यांना हटवून त्यांच्याजागी भुपेंद्र पटेल (bhupendra patel) यांची मुख्यमंत्रीपदावर निवड केली आहे. याच मुद्यावरुन शिवसेनेने आजच्या सामनाच्या अग्रलेखातून भाजपावर (bjp) निशाणा साधला आहे. गुजरात मॉडेलचा फुगा फुटला, असे शिवसेनेने म्हटले आहे. शिवसेनेच्या या टीकेला आता नारायण राणेंचे सुपूत्र आणि कणकवलीचे आमदार नितेश राणे (nitesh rane) यांनी प्रत्युत्तर दिले आहे.

"गुजरात मॉडेल च सोडा. तुम्ही ऐन कोरोना काळात मुंबई पालिका आयुक्त परदेशी का बदलले ते सांगा?" असा सवाल नितेश राणे यांनी विचारला आहे. "तुमचे ते मुंबई मॉडेल चे काय चाटायचे आम्ही ? स्वतःच्या बुडा खाली काय जळते आहे ते आधी बघा.."असे नितेश राणे यांनी त्यांच्या टि्वटमध्ये म्हटले आहे.

हेही वाचा: महिलांचा अपमान करणाऱ्यांचे थोबाड आणि गाल रंगवू शकतो, दरेकरांना इशारा

शिवसेनेने टीका करताना काय म्हटलं आहे

भूपेंद्र पटेल यांची निवड आमदारांकडून एकमताने झाली, पण भूपेंद्र यांनाही आपण मुख्यमंत्री होतोय हे माहीत नव्हते. गेल्या चार वर्षांत त्यांना साधे मंत्रीही केले नव्हते. ते एकदम मुख्यमंत्रीच झाले. दिल्लीहून नाव आले व ते भाजपच्या विधिमंडळ पक्षाने मान्य केले. नेता निवडीसाठी आमदारांनी मतदान केले असते तर दुसऱ्याच एखाद्या नावावर पसंतीची मोहोर उठली असती. काँग्रेस पक्षातही हे असेच घडते व यालाच आपल्याकडे लोकशाही म्हणावे लागते. लोकशाहीचे, राज्यकारभाराचे व विकासाचे गुजरात मॉडेल अशा प्रकारे फुगा फुटावा तसे टपकन फुटले आहे. गुजरात राज्य जर विकास, प्रगतीच्या मार्गावर पुढे जात होते, तर मग अशा पद्धतीने रातोरात मुख्यमंत्री बदलाची वेळ का आली? असे सामनाच्या अग्रलेखात म्हटले आहे.

loading image
go to top