Aditya-Tejsvi will meet : तेजस्वी यादवांचा आदित्य ठाकरे घेणार सल्ला! भाजपविरोधात रणनितीसाठी जाणार बिहार दौऱ्यावर? | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Tejasvi Yadav-Aditya Thackeray:

Bihar: आदित्य ठाकरे घेणार तेजस्वी यादवांचा सल्ला! भाजपविरोधात रणनितीसाठी बिहार दौऱ्यावर?

Aaditya Thackeray : राज्यातील राजकारणात खळबळ माजवणारी घटना काही दिवसांपूर्वी घडली. एकनाथ शिंदे आणि आमदारांनी शिवसेनेतून बंड करून भाजपसोबत सरकार स्थापन केलं. त्यामुळं राज्यातील महाविकास आघाडी सरकार कोसळलं आणि उद्धव ठाकरे यांचे मुख्यमंत्रीपद देखील गेले तेव्हा पासून राज्यात आदित्य ठाकरे आणि पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे चांगलेच एक्टिव झाल्याचे पाहिला मिळाले आहे. (Tejasvi Yadav-Aditya Thackeray)

दरम्यान आदित्य ठाकरे आता बिहारमध्ये भाजपच्या सत्तेला सुरूंग लावणारे तेजस्वी यादव (Tejashwi Yadav) यांची भेट घेणार आहेत. तेजस्वी यादव हे बिहारचे उपमुख्यमंत्री आहेत. त्यांनी बिहारमधील भाजपची सत्ता पलटावून बिहारमध्ये नव्या आघाडीला जन्माला घातला तेजस्वी यादव यांनी नितीश कुमार यांच्या सोबत जात नवं सरकार स्थापन केलं.

हेही वाचा- गरज आहे पंढरपूर पुन्हा समतेचे पीठ होण्याची....

त्यामुळे आदित्य ठाकरे आणि तेजस्वी यादव यांच्या भेटीला विषेश महत्त्व आलं आहे. हा दौरा एकदिवशीय असणार आहे. २३ तारखेला म्हणजे उद्या हा दौरा असणार आहे. आदित्य ठाकरे यांच्या सोबत अनिल देसाई, प्रियंका चतुर्वेदी यांच्यासह अन्य काही नेते बिहारला जाणार आहेत. युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी सरकार जाताच महाराष्ट्र पिंजून काढला. आमदार पक्षातून जावून सुध्दा त्यांनी मोठा जनसंपर्क मिळवला आहे. आदित्य ठाकरे यांचा हा दौरा शिंदे गटाच्या आधि होणार आहे, शिंदे गट येत्या २६ आणि २७ तारखेला गुवाहाटीला जाणार आहेत.