रामदास कदमांची बेईमानी महाराष्ट्र पाहतोय; भास्कर जाधव | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

shiv sena leader Bhaskar Jadhav Criticism Ramdas Kadam

रामदास कदमांची बेईमानी महाराष्ट्र पाहतोय; भास्कर जाधव

चिपळूण : शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखालील पहिला दसरा मेळावा झाला. तेव्हा रामदास कदमांनी ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते म्हणून भाषण केले होते. तोच दसरा मेळावा आता उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीत होऊ नये, असे कदमांनी म्हणणे म्हणजे ते किती कृतघ्न आहेत, ते किती उलट्या काळजाचे आणि बेईमान आहेत, हे संपूर्ण महाराष्ट्र पाहतोय, अशी टीका शिवसेना नेते भास्कर जाधव यांनी केली. गुहागरचे आमदार भास्कर जाधव यांची शिवसेनेच्या नेतेपदी निवड झाल्यानंतर गुहागर शिवसेनेतर्फे शनिवारी त्यांचा सत्कार करण्यात आला. त्यावेळी ते बोलत होते.

उद्धव ठाकरेंनी जेव्हा काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेससोबत सत्ता स्थापन केली, तेव्हाच बाळासाहेब ठाकरे हा विषय त्यांच्यासाठी संपला. बाळासाहेबांनी आयुष्यभर ज्यांच्याशी संघर्ष केला. त्याच शरद पवारांच्या मांडीवर उद्धव ठाकरे जाऊन बसले, अशी बोचरी टीका रामदास कदमांनी केली होती.

विशेष म्हणजे भास्कर जाधवांनी रामदास कदमांचा एकेरी उल्लेख करत त्यांच्या विधानाचा चांगलाच समाचार घेतला. ते म्हणाले, ‘रामदास कदम यांच्यासारखा कृतघ्न माणूस मी कधीही बघितला नाही. रामदास कदम कोण आहे? त्यांचा शिवसेना मेळाव्याशी काय संबंध आहे? रामदास कदम सध्या ज्यापद्धतीने शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर टीका करत आहेत, जे आरोप करत आहेत, जी भाषा वापरत आहेत, यावरून रामदास कदम इतके कृतघ्न असतील, असे मला वाटले नव्हते. विधानसभा निवडणुकीत पराभूत झाल्यानंतरही उद्धव ठाकरेंनी त्यांना आमदार आणि दोनवेळा मंत्री केले. मुलाला तिकीट दिले. मी मरेपर्यंत शिवसेना सोडणार नाही. ‘मातोश्री’शी एकनिष्ठ राहीन, असे कालपर्यंत रामदास कदम बोलत होते. आता तेच रामदास कदम पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि ‘मातोश्री’वर टीका करीत आहेत.’

मुंबईमध्ये पोस्टर युद्ध

ऐन गणेशोत्सवाच्या काळात मुंबईत पोस्टर युद्ध रंगले आहे. कालच वरळी येथे शिंदे गटाच्या समर्थकांनी शिवसेनेचे पोस्टर फाडले होते, त्यानंतर आता युवासेनेने आदित्य ठाकरेंचा मतदारसंघ असलेल्या वरळीत भाजपचे पोस्टर फाडले आहे. गणेशोत्सवाच्या निमित्ताने वरळीत शिवसेनेसह भाजपनेही जोरदार पोस्टरबाजी केली आहे.

Web Title: Shiv Sena Leader Bhaskar Jadhav Criticism Ramdas Kadam Dasara Melava Uddhav Thackeray

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..