Chandrakant Khaire I सर्व कडवट शिवसैनिक..., नाराज आमदारांच्या कुटुंब सदस्यांना खैरेंचा फोन | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Chandrakant Khaire

चंद्रकांत खैरे म्हणाले, सर्व कडवट शिवसैनिक असल्याने ते कुठेही जाणार नाहीत

सर्व कडवट शिवसैनिक..., नाराज आमदारांच्या कुटुंब सदस्यांना खैरेंचा फोन

काल विधान परिषदेच्या निकालानंतर आज सकाळपासून अनेक नाट्यमय राजकीय घडामोडींनी वेग घेतला आहे. या निकालानंतर सेना नेते एकनाथ शिंदे नाराज असल्याची चर्चा आहे. दरम्यान, शिंदे 25 पेक्षा जास्त आमदारांसह सूरतमध्ये मुक्कामाला आहेत. शिंदे थेट भाजप नेत्यांच्या संपर्कात असल्याची माहिती समोर आल्यानं महाविकास आघाडीचं सरकारच अडचणीत येणार का? अशी चर्चा सुरु झाली आहे. तर एका बाजूला शिवसेनेकडून नॉटरिचेबल असलेल्या आमदारांशी संपर्क करण्याचा प्रयत्न केला जात आहे.

शिवसेनेचे नेते चंद्रकांत खैरे यांच्याकडूनही नॉट रिचेबल आमदारांच्या कुटुंबातील सदस्यांशी संपर्क केला जात असून, ते कुठ आहे याची माहिती घेतली जात आहे. यावेळी खैरे म्हणाले, कुठेही कोणीही नाराज नाही. सगळे इथेच असून सगळे येतील. सर्व कडवट शिवसैनिक असल्याने ते कुठेही जाणार नाहीत. आता एकनाथ शिंदेच्या सोबत किती आहेत सांगता येणार नाही. या सर्वांशी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे बोलणार आहे. तसेच माझही काम आहे त्यांची मनधरणी करणे त्यामुळे प्रयत्न करत आहे. तसेच आमदारांच्या नातेवाईकांशी सुद्धा बोलणं सुरु असल्याच खैरे म्हणाले.

दरम्यान, औरंगाबाद जिल्ह्यातील आमदारांच्या यादीत मंत्री संदीपान भुमरे, मंत्री अब्दुल सत्तार, कन्नडचे आमदार उदयसिंह राजपूत,आमदार संजय शिरसाठ, वैजापूर आमदार रमेश बोरनारे हे आमदार एकनाथ शिंदे यांच्यासोबत असल्याची चर्चा आहे. त्यामुळे मराठवाड्यातील या पाच आमदारांचाही एकनाथ शिंदे यांच्यासोबत असल्याचे बोलले जात आहे.

एकनाथ शिंदेंच्या नारावजीवर काय म्हणाले खासदार राऊत?

एकनाथ शिंदे हे आमचे जिवा भावाचे सहकारी आहेत. ते निष्ठावंत शिवसैनिक आहेत. त्यांच्याबरोबर बोलणं होत नाही, तोपर्यंत मी काही बोलणार नाही. आमचे शिवसैनिक आमच्याकडे परत येतील. राज्यात कोणत्याही प्रकारचा भूकंप होणार नाही. महाराष्ट्रात मध्य प्रदेश आणि राजस्थान पॅटर्न राबवण्याचा प्रयत्न सुरु आहे. पण हा प्रयत्न यशस्वी होणार नसल्याचे राऊत म्हणाले आहेत.