'संभाजीनगर, धाराशिवसाठी केंद्रातून महिन्यात मंजुरी मिळवा, अन्यथा फिरु देणार नाही' I Chandrakant Khaire | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Chandrakant Khaire

'श्रेय घेण्यासाठी शिंदे सरकारनं आमच्या निर्णयाला स्थगिती दिली होती.'

'संभाजीनगर, धाराशिवसाठी केंद्रातून महिन्यात मंजुरी मिळवा, अन्यथा फिरु देणार नाही'

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या मंत्रिमंडळानं आपल्या तिसऱ्या मंत्रिमंडळ बैठकीत मोठे निर्णय घेतले आहेत. या बैठकीत ठाकरे सरकारनं घेतलेला औरंगाबादचं नामांतर संभाजीनगर, तर उस्मानाबादचं नामांतर धाराशिव करण्याचा निर्णय पुन्हा घेण्यात आला. या पार्श्वभूमीवर औरंगाबाद शिवसेना नेते चंद्रकांत खैरे (Chandrakant Khaire) यांनी आपली प्रतिक्रिया दिलीय.

माध्यमांशी बोलताना चंद्रकांत खैरे म्हणाले, श्रेय घेण्यासाठी शिंदे सरकानं आमच्या निर्णयाला स्थगिती दिली होती, पण टीकेनंतर त्यांना पुन्हा हा निर्णय घ्यावा लागला. 1988 पासून आम्ही नामांतरासाठी आंदोलन करत आहोत. आता या निर्णयानंतर शिंदे सरकारनं केंद्रातून लवकर मंजुरी आणावी. त्याशिवाय आम्ही कोणताही आनंद साजरा करणार नाही. केद्रांची मान्यता मिळाल्यानंतरच आमचा जल्लोष असेल. सरकारनं एका महिन्यात मंजुरी मिळवावी, अन्यथा फिरुन देणार नाही, असा इशारीही खैरे यांनी सरकारला दिला. या नामांतराचं संपूर्ण श्रेय हे फक्त बाळासाहेबांना आहे, असंही त्यांनी स्पष्ट केलं. फडणवीसांनी त्यांच्या कार्यकाळात हे नामांतर का केलं नाही? असा सवालही खैरेंनी उपस्थित केलाय.

हेही वाचा: महात्मा गांधींवरील वादग्रस्त विधान भोवलं, यती नरसिंहानंदांवर गुन्हा दाखल

ठाकरे सरकारनं शेवटच्या क्षणी घेतलेला हा निर्णय शिंदे-फडणवीस सरकारनं स्थगित केला होता. दोन दिवसांपूर्वी 14 तारखेला झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत पेट्रोल डिझेलचे भाव कमी करणे, थेट सरपंच, नगराध्यक्ष निवड अशा निर्णयांचा सपाटा लावल्यानंतर आज पुन्हा शिंदे-फडणवीस सरकारची मंत्रिमंडळ बैठक पार पडली. आजच्या बैठकीत औरंगाबाद, उस्मानाबाद शहराच्या नामांतरासह नवी मुंबई विमानतळाला दि बा पाटील यांचं नाव देण्याचा पूनर्निणय घेण्यात आला. लवकरच ठराव करुन प्रस्ताव केंद्राला पाठवणार असल्याची माहिती बैठकीनंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली. कायदेशीर पेच निर्माण होऊ नये म्हणून ठाकरे सरकारनं घेतलेल्या निर्णयाला स्थगिती दिली होती, असंही शिंदे म्हणाले.

Web Title: Shiv Sena Leader Chandrakant Khaire Reacts After Sambhajinagar Dharashiv Name Change

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top