Sanjay Raut
Sanjay RautEsakal

Belgaum Court : खासदार संजय राऊतांना मोठा दिलासा; न्यायालयाकडून जामीन मंजूर

खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांना बेळगाव न्यायालयात (Belgaum Court) जामीन मिळाला आहे.
Published on
Summary

महाराष्ट्रातील नेत्यांकडून वारंवार सीमेबाबत वक्तव्य होत असल्यामुळं त्यांना कर्नाटक शासनामार्फत नोटिसा बजावण्यात आल्या आहेत.

बेळगांव : बेळगांवमधून महत्वाची बातमी समोर येत आहे. उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे (शिवसेना) खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांना बेळगाव न्यायालयाकडून (Belgaum Court) जामीन मिळाला आहे.

शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांना बेळगाव न्यायालयानं जामीन मंजूर केलाय. 2018 मध्ये खासदार राऊत एका खासगी कार्यक्रमासाठी बेळगावला आले होते. त्यावेळी विधानसभा निवडणूक आचारसंहिता लागू होती. त्या कार्यक्रमात राऊतांनी केलेल्या भाषणावर आक्षेप घेत त्यांच्यावर आचारसंहिता भंग केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.

त्या प्रकरणी बेळगाव न्यायालयानं राऊत यांना समन्स बजावले होते. त्या प्रकरणी बुधवारी सुनावणी झाली. राऊत यांच्या वतीनं अॅड. शामसुंदर पत्तार यांनी जामीन अर्ज दाखल केला होता, त्यावर आज (बुधवार) न्यायालयाकडून जामीन मंजूर झाला. या जामिनामुळं राऊतांना दिलासा मिळालाय.

Sanjay Raut
Assembly Election : 'ही माझी शेवटचीच निवडणूक'; काँग्रेसच्या बड्या नेत्यानं खेळलं निवडणुकीपूर्वी 'इमोशनल कार्ड'

गेल्या काही दिवसांपासून कर्नाटक-महाराष्ट्र सीमावाद चिघळला आहे, त्यामुळं महाराष्ट्रातील नेत्यांवर बेळगांव जिल्ह्यात येण्यास बंदी घालण्यात आली आहे. त्यातच महाराष्ट्रातील नेत्यांकडून वारंवार सीमाप्रश्नांबाबत वक्तव्य होत असल्यामुळं त्यांना कर्नाटक शासनामार्फत नोटिसा बजावण्यात आल्या आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com