

Pune Teachers Constituency Election
esakal
Teacher MLC Election : पुणे विभागीय शिक्षक मतदारसंघाच्या विधान परिषद निवडणुकीत महायुतीसमोरच नवे आव्हान उभे राहिले आहे. भाजपने कौस्तुभ गावडे यांना उमेदवारी दिल्यानंतर शिवसेनेचे मंगेश चिवटे यांनी बंडखोरी करत आज जोरदार शक्तिप्रदर्शनात उमेदवारी अर्ज दाखल केला. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या आदेशानुसार आपण निवडणूक रिंगणात उतरत असल्याचे चिवटे यांनी स्पष्ट केले.