मंत्र्यांना काढण्यासाठी शिवसेना आमदारांची मोहीम 

मृणालिनी नानिवडेकर - सकाळ न्यूज नेटवर्क 
गुरुवार, 9 मार्च 2017

मुंबई - शेतकऱ्यांना कर्जमाफी द्या, या मागणीसाठी विधानसभा अध्यक्षांच्या आसनासमोरील जागेत (वेल) जाणाऱ्या आमदारांना सबुरीचा सल्ला देणाऱ्या शिवसेना मंत्र्यांविषयी पक्षातच असंतोष पसरला आहे. कर्जमाफीच्या मागणीमुळे ग्रामीण भागात जनसमर्थन मिळेल, याची जाणीव नसलेल्या मंत्र्यांना आता बदला, अशी मागणी करत काही आमदारांनी "मातोश्री' गाठायची ठरविले असल्याचे समजते. 

युतीमधल्या तणावादरम्यान कर्जमाफीची मागणी भाजपकडे करणाऱ्या शिवसेनेला आता मंत्री तारुण नेत नसल्याचा संताप आमदारांमध्ये बुधवारी व्यक्त होत होता. एकनाथ शिंदे वगळता कोणत्याही मंत्र्याला लोकभावना समजत नाही, जनतेशी त्यांचा संपर्क राहिलेला नाही, अशी तक्रार काही शिवसेना आमदारांनी सुरू केली आहे. कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी कॉंग्रेस यांच्यासमवेत कर्जमाफीच्या मागणीसाठी आमदारांनी "वेल'मध्ये उतरायचे ठरविले होते. शिवसेनेच्या मंत्र्यांना याची कुणकुण लागताच त्यांनी आपण सत्ताधारी आघाडीचा भाग आहोत, हे विसरू नका, याची जाणीव करून दिली. त्यामुळे आमदार संतप्त झाले. 

काही आमदारांनी विधानसभा अध्यक्षांना आम्हीही "वेल'मध्ये उतरतो आहे, असे पत्र परस्पर पाठवून दिल्याचे समजते. यामुळे मंत्री काहीसे नाराज होताच, शिवसेना आमदार संतापले. त्यानंतर आता मंत्र्यांच्या अकार्यक्षमतेसंबंधी थेट "मातोश्री'वरच तक्रार करण्याचा विचार सुरू झाला आहे. "मातोश्री'वर या तक्रारीची कितपत दखल घेतली जाते, यावरच महाराष्ट्रातील आगामी यशापयश अवलंबून असेल, असे शिवसेनेच्या एका ज्येष्ठ आमदाराने सांगितले.

Web Title: Shiv Sena MLAs campaign to remove ministers