
शिवसेना X मोदी सरकार : आदित्य ठाकरेंच्या कार्यकाळातील कामाचं केंद्राकडून ‘ऑडिट’
सातपूर : राज्यात शिवसेना आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटात खडाजंगी सुरू असताना केंद्र सरकारने तत्कालिन पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांच्याकडील खात्याच्या गेल्या अडीच वर्षातील कामाचे ऑडिट सुरू केले आहे. यात विशेषतः महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या कारभार केंद्रस्थानी ठेवण्यात आला आहे. दरम्यान मंडळाच्या कारभाराबाबत काही नव्या सूचना, उपाययोजना होणार असतील तर चांगलेच पण उगाच मंडळ बदनामीचे धनी होऊ नये, अशी अपेक्षा कर्मचारी आणि अधिकारींनी व्यक्त केली आहे.
आदित्य ठाकरे सध्या राज्याच्या दौऱ्यावर संवाद यात्रेत सहभागीअसून विशेषतः शिवसेनेतील बंडखोर आमदारांच्या मतदारसंघात जात ते तेथे शिवसेनेची बाजू पटवून देत शिवसेना पुन्हा भरारी घेईल, असा आशावाद कार्यकर्त्यांत निर्माण करीत आहेत. त्यांच्या दौऱ्याला जोरदार प्रतिसादही मिळत आहे, त्यामुळे केंद्राच्या या ऑडिटच्या फर्मानाकडे वेगळ्या अर्थाने पाहिले जात आहे.
महाराष्ट्र प्रदुषण नियत्रंण मंडळाच्या कारभाराबाबत केंद्राने मुंबईतील मुख्यालयापासून पुणे, कोल्हापूर, नागपूर, चंद्रपूर, अमरावती, औरंगाबाद, नाशिक, ठाणे, रायगड आदी विभागांतील कार्यालयात हे केंद्रीय ऑडिट सुरू करण्यात आले आहे. पहिल्या टप्प्यात मुख्यालयाबरोबर नागपूर कार्यालयाचा समावेश आहे. त्यानंतर टप्प्याटप्प्यात इतर विभागीय कार्यालयांचेही ऑडिट करण्याबाबत खातेप्रमुखाना सूचना देण्यात आल्या आहेत. दरम्यान यात योग्य उपाययोजना सुचवण्यात आल्या तर त्याचे स्वागतच केले जाईल, पण केवळ राजकारणामुळे मंडळ बदनाम होऊ नये अशी अपेक्षा या विभागातील अधिकारी कर्मचारी व्यक्त करत आहे.
Web Title: Shiv Sena Modi Government Audit Of Aditya Thackeray Tenure By Central Government Nashik
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..