Uddhav Thackeray : उद्धव ठाकरेंच्या पक्षप्रमुख पदाबाबत शिवसेना खासदाराचे मोठे विधान! म्हणाले...

Uddhav Thackeray
Uddhav Thackeray

शिवसेना नेते आणि राज्यसभा खासदार संजय राऊत यांनी गुरुवारी जम्मू-काश्मीरला भेट दिली. संजय राऊत यांनी काश्मिरी पंडितांची भेट घेतली. राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेचा शेवटचा टप्पा जम्मू-काश्मीरमध्ये सुरु आहे. या यात्रेत सहभागी होण्यासाठी संजय राऊत काश्मीरला गेले होते. दरम्यान आज पत्रकार परिषद घेत संजय राऊत यांनी मोठी घोषणा केली आहे. 

काल उद्धव ठाकरे यांच्या पक्षप्रमुख पदाचा मुद्दा निवडणूक आयोगात उपस्थित करण्यात आला. मात्र आयोगाने कोणताही निर्णय दिला नाही. त्यामुळे संभ्रम वाढला आहे. शिवसेना पक्षप्रमुख पद हे घटनाबाह्य असल्याचा आक्षेप शिंदे गटाने घेतला आहे. त्यामुळे ठाकरे गटासमोर पेच निर्माण झाला आहे. यावर संजय राऊत म्हणाले, "आमचा पक्षप्रमुख कोण असेल हे पक्ष ठरवेल. उद्धव ठाकरे हे पक्षाचे अध्यक्ष आहेत. तेच नेतृत्व करतील."

Uddhav Thackeray
Kasba Peth Bypoll Election : कसब्यात काँग्रेस-राष्ट्रवादी-भाजपमध्ये इच्छुकांची गर्दी, पक्षश्रेष्ठींचीं डोकेदुखी वाढणार

शिवसेना जम्मू-काश्मीरमध्ये निवडणूक लढवणार असल्याची घोषणा संजय राऊत यांनी केली आहे. संजय राऊत म्हणाले, "जम्मू-काश्मीरमध्ये निवडणूक लढवण्याची आमची पूर्ण तयारी आहे. एक चांगली युती बनली आणि आम्हाला सम्मानीय स्थान मिळाले तर आम्ही विचार करु. नाहीतर स्वत:च्या दमावर निवडणूक लढवू. आम्ही काम केले तर लोक आमच्या सोबत येतील. जम्मू-काश्मीरसोबत आम्ही नेहमी आस्था ठेवली आहे. मुंबई आणि दिल्लीत बसून आम्ही जम्मू-काश्मीरच्या लोकांसाठी काम करतो.

Uddhav Thackeray
Dhananjay Munde : पंकजा मुंडेंपाठोपाठ उपमुख्यमंत्रीही धनंजय मुंडे यांच्या भेटीला

भाजप उपाध्यक्षांनी दावा केला आहे की, विरोधी आमदार भाजप आणि शिंदे सरकारमध्ये सामिल होत आहेत. यावर संजय राऊत म्हणाले, ते जो बायडनच्या पक्षातील लोक देखील फोडतील.

Uddhav Thackeray
Eknath Shinde : शिंदेंचा जयंत पाटलांना चिमटा; म्हणाले, अधिवेशनाच्या शेवटच्या...

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com