
सोनिया गांधींना वारंवार ईडी कार्यालयात बोलावणं चुकीचं आहे.
छत्रपतींच्या बाबतीतही विश्वासघातकाचं राजकारण, पाठीत खंजिर खुपसणाऱ्यांना जनता माफ करणार नाही : राऊत
मुंबई : गेल्या काही दिवसांत शिवसेना (Shiv Sena) पक्षात मोठी उलथापालथ झाली. शिवसेनेचे आणि शिवसेनाप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या विश्वासातील अनेक मंत्र्यांनी, आमदारांनी आणि खासदारांनी त्यांची साथ सोडली. शिवसेनेचे ज्येष्ठ नेते एकनाथ शिंदे यांनी हे बंड पुकारलं आणि जवळपास 40 हून जास्त आमदारांनी एकनाथ शिंदे यांना पाठिंबा दिला. त्यानंतरही अनेक आमदारांनी शिवसेनेच्या पदांचे राजीनामे दिले आणि शिंदे गटात सामील झाले.
त्यामुळं आज एकनाथ शिंदे हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले आहेत. पण, या सगळ्यात शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी मात्र नेहमीच बंडखोर आमदारांवर टीकास्त्र सोडलं आहे. याच पार्श्वभूमीवर राऊतांनी माध्यमांशी बोलताना बंडखोरांवर आक्रमक शब्दात टीका केलीय. शिवाय, त्यांनी काँग्रेस (Congress) अध्यक्षा सोनिया गांधी (Sonia Gandhi) यांच्या चौकशीबाबतही मोठं वक्तव्य केलंय.
हेही वाचा: ED Inquiry : सोनिया गांधींची 'ईडी'कडून आज पुन्हा चौकशी; राजघाटवर कलम 144 लागू
संजय राऊत म्हणाले, छत्रपतींच्याबाबतीतही विश्वासघातकाचं राजकारण झालं. पण, पाठीत खंजिर खुपसणाऱ्यांना जनता कधीच माफ करणार नाही, अशा शब्दांत त्यांनी बंडखोर आमदारांनी चांगलंच सुनावलं. यावेळी त्यांनी सोनिया गांधींच्या ईडी चौकशीबाबतही भाष्य केलंय. सोनिया गांधींना वारंवार ईडी कार्यालयात बोलावणं चुकीचं आहे. ईडी अधिकारी त्यांच्या घरी जाऊन देखील गांधींची चौकशी करु शकतात. वयाच्या 75 व्यावर्षी त्रास देणं चुकीचं असल्याचं मत त्यांनी व्यक्त केलं. भाजपकडून विरोधकांचा छळ सुरु असल्याचंही ते म्हणाले. यावेळी त्यांनी आदित्य ठाकरे आणि अर्जुन खोतकरांवर देखील भाष्य केलं. आदित्य ठाकरेंनी घेतलेले निर्णय हे राज्य हिताचे आहेत, असंही त्यांनी सरकारला स्पष्टपणे सांगितलं. तर, खोतकर सध्या शिवसेनेतच असल्याची पुष्ठी त्यांनी यावेळी दिली.
Web Title: Shiv Sena Mp Sanjay Raut Criticized Rebel Mlas
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..