ED Inquiry : सोनिया गांधींची 'ईडी'कडून आज पुन्हा चौकशी; राजघाटवर कलम 144 लागू | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

National Herald Case Sonia Gandhi

प्रियंका गांधी आणि राहुल गांधी आज त्यांच्या आईसोबत (सोनिया गांधी) ईडी कार्यालयात जाण्याची शक्यता आहे.

ED Inquiry : सोनिया गांधींची 'ईडी'कडून आज पुन्हा चौकशी; राजघाटवर कलम 144 लागू

नवी दिल्ली : नॅशनल हेराल्ड (National Herald Case) वृत्तपत्राशी संबंधित मनी लाँड्रिंग प्रकरणासंदर्भात (Money Laundering Case) अंमलबजावणी संचालनालय (ईडी) आज (मंगळवार) पुन्हा काँग्रेस (Congress) अध्यक्षा सोनिया गांधी (Sonia Gandhi) यांची चौकशी करणार आहे.

अधिकार्‍यांनी दिलेल्या माहितीनुसार, सोनिया गांधी आज 26 जुलैला दुपारी ईडीसमोर हजर राहून जबाब नोंदवणार आहेत. ईडीनं त्यांना सोमवारी चौकशीसाठी बोलावलं होतं. मात्र, चौकशी एका दिवसासाठी पुढं ढकलण्यात आली. ईडीनं 21 जुलै रोजी सोनिया गांधींची 2 तासांपेक्षा जास्त चौकशी केली होती. या कालावधीत तपास यंत्रणेनं गांधींना सुमारे 28 प्रश्न विचारले होते.

हेही वाचा: निवडणूक लढवणार नाही म्हणणाऱ्या येडियुरप्पांनी घेतला यू-टर्न; म्हणाले, माझ्या मुलाला..

अधिकार्‍यांच्या म्हणण्यानुसार, सोनिया गांधींच्या ईडी कार्यालयात उपस्थितीदरम्यान सर्व प्रोटोकॉलचं पालन केलं जाणार आहे. रुग्णवाहिकांसह डॉक्टरांची टीम तैनात करणं, 'COVID निगेटिव्ह' प्रमाणपत्रं घेणं यांचा समावेश आहे. दरम्यान, प्रियंका गांधी-वाड्रा (Priyanka Gandhi) आणि राहुल गांधी (Rahul Gandhi) आज त्यांच्या आईसोबत (सोनिया गांधी) ईडी कार्यालयात जाण्याची शक्यता आहे. काँग्रेसनं केंद्रीय तपास यंत्रणेच्या या कृतीचा निषेध केला असून याला राजकीय सूडबुद्धी असल्याचं म्हटलंय. काँग्रेस नेते आणि कार्यकर्त्यांच्या निषेधाच्या पार्श्वभूमीवर दिल्ली पोलिसांनी राजघाटावर कलम 144 लागू केलंय. राष्ट्रीय राजधानीतील प्रमुख ठिकाणी केंद्रीय राखीव पोलीस दल आणि जलद कृती दल ईडी कार्यालयाबाहेर तैनात करण्यात आले आहेत.

हेही वाचा: BJP : महाराष्ट्रानंतर 'या' राज्यात लवकरच सत्तांतर; भाजपचे 16 आमदार फुटणार?

Web Title: Congress Leader Sonia Gandhi Will Appear Before Ed Today For Investigation In National Herald Case Section 144 Imposed At Rajghat

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..