esakal | यंदा असा होणार दसरा मेळावा, संजय राऊत यांनी दिली माहिती
sakal

बोलून बातमी शोधा

यंदा असा होणार दसरा मेळावा, संजय राऊत यांनी दिली माहिती

यंदा असा होणार दसरा मेळावा, संजय राऊत यांनी दिली माहिती

sakal_logo
By
नामदेव कुंभार

शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी शिवसेनेच्या दसरा मेळाव्याविषयी मोठं वक्तव्य केलं आहे. यंदाचा दसरा मेळावा ऑनलाइन न होता प्रत्यक्षात होईल, असं संजय राऊत म्हणाले आहेत. कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर गेल्यावर्षीचा दसरा मेळावा ऑनलाइन झाला होता. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाल्यानंतरचा तो पहिलाच दसरा मेळावा होता. मात्र, यंदा दसरा मेळावा प्रत्यक्षात होणार असल्याचं संजय राऊत यांनी सांगितलं आहे. सगळ्या गोष्टीचा विचार करून दसरा मेळाव्याबाबत सकारात्मक निर्णय घेतला जाईल, असे राऊत यांनी सांगितले.

यंदाचा दसरा मेळावा प्रत्यक्ष पद्धतीने होणार आहे. कोरोना नियमांचे पालन करून दसरा मेळावा होईल. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यावर लवकरच निर्णय घेतील, असं संजय राऊत यांनी बुधवारी प्रसारमाध्यमांसोबत बोलताना सांगितलं. यावेळी राऊत यांनी उत्तर प्रदेशमधील लखीमपूर घटनेवर विरोधकांच्या होणाऱ्या अडवणूकीवरही राऊत यांनी नाराजी व्यक्त केली. शिवाय या घटनेवर केंद्र सरकारने अद्याप संवेदना का व्यक्त केल्या नाहीत? असा सवालही उपस्थितीत केला.

लखीमपूर हिसांचारावर बोलताना राऊत म्हणाले की, लखीमपूर मध्येजो प्रकार घडला, त्यामुळं सगळ्यांना चिंता आहे. केंद्र सरकार कडून अद्याप संवेदना का व्यक्त केल्या नाहीत? आजही ते प्रकरण दाबण्याचा प्रयत्न केला जातोय, आणि विरोधकांना दोष दिला जातोय. संतापला वाट मोकळी करून देणे विरोधी पक्षाचे काम आहे. काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांना मंगळवारी भेटलो, ते आज लखनौला जाणार आहेत, त्यांनाही अडवले जाणार असल्याचं समजतेय.

loading image
go to top