ST Workers Strike : एसटी कर्मचाऱ्यांचा गिरणी कामगार करायचाय का - संजय राऊत | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

संजय राऊत

राज्य सरकारची आर्थिक स्थिती चांगली नसताना इतक्या मोठ्या प्रमाणावर पगारवाढ देत असल्याचंही राऊतांनी यावेळी सांगितलं.

एसटी कर्मचाऱ्यांचा गिरणी कामगार करायचाय का - संजय राऊत

sakal_logo
By
टीम ई सकाळ

एसटी कर्मचाऱ्यांच्या संपाचा तिढा अद्याप सुटण्याची चिन्हे दिसत नाहीयेत. एकीकडे राज्य सरकारने पगारवाढीची घोषणा केली असली तरी कर्मचाऱ्यांनी संप सुरुच ठेवला आहे. आता यावर शिवसेना खासदार संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे. तसंच कामगारांचे नेते बनलेल्यांना आता एसटी कर्मचाऱ्यांचा गिरणी कामगार करायचा आहे का असं म्हणत राऊतांनी सवाल विचारला आहे.

कामगारांना चांगल्या प्रकारे आर्थिक पाठबळ किंवा मदत मिळावी यासाठी एक पॅकेज सरकारने जाहीर केलं. परिवहन मंत्र्यांनी आकडे दिले आहेत. कमीत कमी ५ हजार रुपयांची पगारवाढ केली आहे. राज्य सरकार याची तरतूद करणार आहे. कामागारांचे नेते आणि त्या नेत्यांना पाठबळ देणारे राजकीय पक्ष हे जर संप चिघळवत ठेवणार असतील तर ते हजारो कामगार आणि त्यांच्या कुटुंबाचे नुकसान करतायत. त्यांना एसटी कामगारांचा गिरणी कामगार करायचा आहे का असा सवाल राऊतांनी विचारला. असं करू नका असंही राऊत म्हणाले.

हेही वाचा: सरकारच्या घोषणेनंतरही राज्यभरात संप सुरुच; पडळकर काय म्हणाले?

राज्य सरकार आणि राज्याचे मुख्यमंत्री आम्ही सगळे लोक कामगारांबाबत संवेदनशील आहोत. महाराष्ट्र, मुंबई ही कामगारांच्या शेतकऱ्यांच्या लढ्यातून आम्हाला मिळाले आहेत. कष्टकऱ्यांचं नुकसान व्हावं असं राज्य सरकार कधीच करणार नाही. राज्य सरकारची आर्थिक स्थिती चांगली नसताना इतक्या मोठ्या प्रमाणावर पगारवाढ देत असल्याचंही राऊतांनी यावेळी सांगितलं.

कामगारांनी थोडं समजुतीने घ्यावं, कामगार घेतायत पण विशिष्ट वर्ग आहेत. पण राज्यासह देशातील वरिष्ठ नेत्यांबद्दल एकेरी भाषेत बोलत होते. तुमची लायकी काय आहे? कोण लागून गेले? तुम्ही प्रमुख नेते आहात. महाराष्ट्रातले, राज्यात मुख्यमंत्री, केंद्रीय मंत्रीपद भूषवलं त्यांचा एकेरी उल्लेख करता. तुमचं असं काय कर्तृत्व आहे असा सवालसुद्धा राऊतांनी विचारला.

हेही वाचा: समीर वानखेडे मुस्लिम असल्याचा आणखी एक पुरावा! मलिकांचा बॉम्ब

गोपीचंद पडळकर आणि सदाभाऊ खोत संपातून माघार घेतायत. याबद्दल दोन्ही नेत्यांनी समंजस भूमिका घेतली असेल तर त्यांचे स्वागत आहे असंही संजय राऊत यांनी म्हटलं. संप कुठे संपवायचा याचा विचार करायला लागतो. जर तो खेचत नेला तर हजारो कामगारांचे नुकसान होईल आणि त्यांची कुटुंबं रस्त्यावर येतील असंही राऊत म्हणाले.

loading image
go to top