एसटी कर्मचारी काय निर्णय घेणार? गोपीचंद पडळकर म्हणतात... | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

gopichand padalkar

कर्मचाऱ्यांनी कामावर रुजू व्हावं असं आवाहन सरकारने केलं होतं. मात्र अजूनही कर्मचाऱी त्यांच्या विलिनीकरणाच्या मागणीवर ठाम असून राज्यभरात संप सुरु आहे.

सरकारच्या घोषणेनंतरही राज्यभरात संप सुरुच; पडळकर काय म्हणाले?

राज्य सरकारने (Maharashtra Govt.) एसटी कर्मचाऱ्यांना (St Workers) त्यांच्या मूळ वेतनात पगारवाढ देण्याची घोषणा केली. तसंच ही पगारवाढ नोव्हेंबरपासून देऊ असंही सरकारने म्हटलं. मात्र तरीही कर्मचाऱ्यांनी अंतरिम पगारवाढ मान्य नाही आम्हाला विलिनीकरणच हवं आहे या मागणीवर कर्मचाऱी ठाम आहेत. आम्हाला सरकारने पगारवाढीचे गाजर दाखवू नये अशी भूमिका कर्मचाऱ्यांनी घेतली आहे. दरम्यान, आता यावर भाजप नेते गोपीचंद पडळकर (Gopichand Padalkar) हे सकाळी अकरा वाजता पत्रकार परिषद घेऊन कर्मचाऱ्यांची भूमिका आणि पुढच्या वाटचालीबद्दल सविस्तर माहिती देणार आहेत. आज सकाळी कर्मचाऱ्यांनी कामावर रुजू व्हावं असं आवाहन सरकारने केलं होतं. मात्र अजूनही कर्मचाऱी त्यांच्या विलिनीकरणाच्या मागणीवर ठाम असून राज्यभरात संप सुरु आहे.

सरकारसोबत एसटी कर्मचाऱ्यांच्यावतीने झालेल्या चर्चेच्या फेऱ्यांमध्ये गोपीचंद पडळकर आणि सदाभाऊ खोत हे बोलत होते. त्यांनी सरकारने ठेवलेला प्रस्तावसुद्धा कर्मचाऱ्यांना सांगितला आता कर्मचारी संप मागे घेणार की तिढा कायम राहणार याकडे लक्ष लागून राहिलं आहे. गोपीचंद पडळकर यांनी गुरुवारी सकाळी बोलताना सांगितलं की, कर्मचाऱ्यांच्या शिष्टमंडळाकडे सरकारने प्रस्ताव मागितला. सरकारने जे काही चर्चेवेळी म्हटलं त्याबद्दल कर्मचाऱ्यांना सांगितला. त्यानंतर जो प्रस्ताव कर्मचाऱ्यांनी दिला त्यावर सरकारने त्यांच्यावतीने जे शक्य आहे ते केलं आहे.

हेही वाचा: ST Workers Strike | पगारवाढीचे गाजर नको; संपकरी विलिनीकरणावर ठाम

सरकारच्या घोषणेनंतर जे काही झालं त्याबद्दल रात्री कर्मचाऱ्यांशी चर्चा झाली. आता आणखी काही कर्मचाऱ्यांशी बोलून पुढे काय करायचं याबाबत ११ वाजता पत्रकार परिषद घेऊन सांगणार असल्याचं भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी सांगितलं. मात्र अद्याप कर्मचाऱ्यांनी ही पगारवाढ घसघशीत नाही तर एकतर्फी असल्याचं म्हटलं जात आहे. सरकारने पगारवाढीची घोषणा केली असली तरी कर्मचाऱ्यांना मान्य नसल्यानं संपावर अद्याप तोडगा निघालेला नाही. कर्मचाऱ्यांनी त्यांचा संप सुरुच ठेवला आहे.

loading image
go to top