Sanjay Raut:संजय राऊतांची दिवाळीदेखील कोठडीतच | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

 Sanjay Raut

Sanjay Raut: संजय राऊतांची दिवाळीदेखील कोठडीतच

शिवसेना खासदार संजय राऊत यांची दिवाळीदेखील कोठतीच जाणार आहे. गोरेगावमधील पत्राचाळ घोटाळ्याबाबत सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) दाखल केलेल्या मनी लाँड्रिंग प्रकरणात अटकेत असलेले संजय राऊत यांच्या कोठडीत १३ दिवसांची वाढ करण्यात आली आहे. (shiv sena mp sanjay rauts judicial custody till 2 november )

त्यामुळे राऊत यांना यंदाची दिवाळी ही जेलमध्येच साजरी करावी लागणार आहे. या प्रकरणाची पुढील सुनावणी 2 नोव्हेंबरला होणार आहे.

गोरेगाव येथील पत्राचाळ घोटाळा प्रकरणात संजय राऊत यांना ईडीने जून महिन्यात अटक केली होती. त्यानंतर राऊत यांना कोर्टाने न्यायालयीन कोठडी सुनावली होती. राऊत यांचा मुक्काम हा आर्थर रोड कारागृहामध्ये हलवण्यात आला. आज राऊत यांना पुन्हा एकदा PMLA न्यायालयात हजर केले होते. राऊत यांचा जामीन अर्ज आणि नियमित सुनावणी एकाचवेळी सुरू झाली.

ईडीकडून सॉलिसिटर जनरल अनिल सिंह यांनी युक्तिवाद केला. आज सायंकाळपर्यंत संजय राऊत यांचे वकील अशोक मुंदरंगी अजून काही मुद्दे लेखी सादर करणार आहे. मात्र हे प्रकरण अत्यंत कॉम्लिकेटेड असल्यानं मलाही याचा व्यवस्थित अभ्यास करावा लागणार आहे, असं कोर्टाने स्पष्ट केलं.

न्यायालयाने युक्तिवाद ऐकून घेत संजय राऊत यांच्या जामीन अर्जावर 2 नोव्हेंबरला सुनावणी पुढे ढकलली आहे. त्यामुळे राऊत यांना जेलमध्येच मुक्कामी थांबावे लागणार आहे.