विकासकामांच्या मंजुरीसाठी राष्ट्रवादी, काँग्रेसची दांडी ; इस्लामपुरात शिवसेना आक्रमक : Sangli | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

jayant patil

विकासकामांच्या मंजुरीसाठी राष्ट्रवादी, काँग्रेसची दांडी; शिवसेना आक्रमक

sakal_logo
By
पोपट पाटील

इस्लामपूर (सांगली) : जिल्ह्याचे पालकमंत्री व जलसंपदा मंत्री जयंत पाटील (Jayant Patil)व त्यांचे राष्ट्रवादीचे कार्यकर्ते राजकीय श्रेयवादासाठी शहराच्या विकासाला खो घालत असल्याचा आरोप शिवसेना तालुकाप्रमुख सागर मलगुंडे(Sagar Malgunde) यांनी आज येथे पत्रकार परिषदेत केला.आज नगरपालिकेत ११ कोटी रुपयांच्या विकासकामानां मंजुरी देण्यासाठी बोलावलेल्या विशेष सभेला राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेवकांनी दांडी मारली. त्यामुळे सभा रद्द करावी लागली. त्या पार्श्वभूमीवर मलगुंडे यांनी ही टीका केली.

ते म्हणाले, " शिवसेना जिल्हाप्रमुख आनंदराव पवार यांनी केलेल्या पाठपुराव्याने मुख्यमंत्री यांच्याकडून शहराच्या विकासासाठी अकरा कोटी रुपये मिळणार आहेत. या निधीची अंमलबजावणी करण्यासाठी नगरपालिकेची विशेष सभा बोलावली होती. यापूर्वी तीनवेळा मागील सभा तहकुब केली आहे. हे कारण पुढे करीत ते उपस्थित राहिले नाहीत. मागील सभेचा या विशेष सभेचा काहीही संबंध नाही; परंतु राष्ट्रवादीच्या नेत्यांनी नगरसेवकांना सभेस जाण्यास मनाई केल्याचे दिसत आहे. याचा शिवसेना जाहीर निषेध करीत आहे."

हेही वाचा: बैलगाडी शर्यतीचा धुरळा उडणार? सर्वोच्च न्यायालयात सुनावणी

नगरसेवक शकील सय्यद म्हणाले, "या ११ कोटींच्या निधीला विरोध म्हणजे जनतेच्या विकासाला विरोध आहे. शिवसेनेची अपेक्षापूर्ती होत आहे. हे श्रेय आपणास मिळणार नाही हा पोटशुळ आहे. फक्त कागद नाचवून सत्ता मिळवणे हे त्यांचे काम आहे. खरे कोण, खोटे कोण हे जनतेला माहीत आहे. शनिवारी ( ता.१३ ) कायदेशीर नियमातून सभा आयोजित केली आहे. शहराला आलेला विकासासाठीचा निधी परत जाणार नाही याची काळजी जिल्हा प्रमुख आनंदराव पवार घेत आहेत. हा निधी शिवसेनेचाच म्हणूनच खर्ची पडेल." नगरसेवक प्रदीप लोहार, राजेंद्र पवार, उपतालुकाप्रमुख अंकुश माने, सचिन पाटील, शहर संघटक सतिश पाटील, राजेंद्र पाटील, सुभाष जाधव उपस्थित होते.

loading image
go to top