Shiv Sena Symbol Hearing : युक्तिवाद सुरु असतांना कामकाज काही काळासाठी थांबवलं | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Shiv Sena Symbol Hearing

Shiv Sena Symbol Hearing : युक्तिवाद सुरु असतांना कामकाज काही काळासाठी थांबवलं

नवी दिल्लीः शिवसेना पक्षचिन्हासंदर्भात आज केंद्रीय निवडणूक आयोगाकडे सुनावणी सुरु आहे. आज अंतिम निकाल येण्याची शक्यता आहे. दोन्ही गटाकडून ताकद लावली जात असून खरी शिवसेना कुणाची? याचा निवडणूक आयोगातील निर्णय आज होऊ शकतो. सध्या ठाकरे गटाचे वकील कपिल सिब्बल यांचा युक्तीवाद सुरु आहे.

कपिल सिब्बल यांनी शिवसेनेच्या घटनेचा मुद्दा उपस्थित केला असून प्रतिनिधीसभा ठाकरेंकडेच असल्याचा दावा केला आहे. शिंदे गटाची प्रतिनिधी सभाच नाही. पक्ष सोडून गेलेले लोक प्रतिनिधी सभेचा भाग होऊ शकत नाहीत. त्यामुळं घटनेनुसार, प्रतिनिधी सभा ठाकरेंकडेच आहे आणि प्रतिनिधी सभाच पक्ष चालवते, असं आयोगाला कपिल सिब्बल यांनी सांगितलं.

हेही वाचाः मेडिकल मॅनेजमेंटही हृदयविकारावर ठरु शकते उपाय

मात्र ही सुनावणी सुरु असतांनाच मध्येच एक मेसेज आला. त्या मेसेजनंतर सुनावणी काही काळासाठी थांबवली गेली. त्यानंतर पुन्हा ही सुनावणी सुरु झाली आहे. 'एबीपी माझा'ने यासंदर्भातील वृत्त दिले आहे.

मात्र युक्तिवाद सुरु असतांना अचानक आलेला तो मेसेज नेमका कुणाचा? असा प्रश्न उपस्थित होत आहे.

हेही वाचा: ShivSena Symbol: शिवसेनेच्या घटनेनुसार प्रतिनिधी सभा आमची! ठाकरेंनी आयोगासमोर टाकला मोठा डाव

दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी हे काल मुंबई दौऱ्यावर होते. यावेळी एकनाथ शिंदे यांनी केलेलं भाषण आज शिंदे गटाची अडचण ठरण्याची शक्यता आहे. कालच्या भाषणामध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी 'आम्ही मोदींचेच' असल्याचं म्हटलं होतं. त्यावरुन आज ठाकरे गट नवा मुद्दा उपस्थित करु शकतो, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.

शिंदे गटाचे आमदार गुवाहटीला का गेले- सिब्बल

पक्षाच्या प्रतिनिधी सभेला हजेरी न लावता शिंदे गटाचे आमदार गुहावटीला का गेले? त्यांनी लोकशाहीनुसार आपलं म्हणणं मांडायला हवं होतं. राजकीय पक्ष म्हणून शिंदे गटाने कागदपत्रे सादर केली आहेत का? असा सवाल विचारत शिंदे गट हा राजकीय पक्षच नाही, असंही यावेळी सिब्बल यांनी म्हटलं आहे.