पहिला डाव भूताचा; सय्यद यांच्या शिंदे गटाच्या प्रवेशा नंतर शिवसेनेची प्रतिक्रिया | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Dipali Sayyed

Dipali Sayyed: पहिला डाव भूताचा; सय्यद यांच्या शिंदे गटाच्या प्रवेशा नंतर शिवसेनेची प्रतिक्रिया

उद्धव ठाकरे गटाला आणखी एक धक्का बसला आहे. प्रसिद्ध अभिनेत्री आणि ठाकरे गटाच्या नेत्या दिपाली सय्यद या शिंदे गटात प्रवेश करणार आहेत. स्वत: दिपाली सय्यद यांनी आपल्या प्रवेशाची माहिती दिली आहे. दरम्यान, शिवसेनेच्या फायर ब्रिगेड म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सुषमा अंधारे यांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त केली.

दिपाली सय्यद यांनी आज वर्षा निवासस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली. त्यानंतर ठाकरे गट सोडणार असल्याची घोषणा त्यांनी केली. मी येत्या शनिवारी शिंदे गटात सहभागी होणार आहे. येत्या तीन दिवसांवर माझा प्रवेश आहे. त्यामुळे कधी आणि किती वाजता प्रवेश करायचा. कुठे प्रवेश होईल, याची चर्चा करण्यासाठी मी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना भेटले, असं दिपाली सय्यद यांनी सांगितलं.

त्यांच्या या धक्कादायक माहिती नंतर शिवसेनेच्या नेत्यांनी प्रतिक्रिया दिली. यावेळी सेना नेत्या किशोरी पेडणेकर आणि सुषमा अंधारे यांनी आपली पहिली प्रतिक्रिया व्यक्त केली.

काय म्हणाल्या अंधारे?

त्यांचा प्रवेश पाहून मला हसायला येत आहे. शीवतीर्थीवरील भाषणानंतर त्यांनी माझं तोंडभरुन कौतुक केल होता. ४ - ५ दिवसात त्यांची भूमिका बदलू शकते. त्यांनी आत्मपरिक्षण करण्याची गरज आहे. अजून प्रवेश झालेला नाही. त्यामुळे त्या कदाचित पलटूदेखील शकतात.

गुवाहाटीला गेल्यावर शिंदे सरकारबद्दल त्यांनी आक्रमक भूमिका मांडिली होती. त्यांना स्वतःच करिअर घडवायचं असेल. त्यामुळे त्यांनी नवा मार्ग स्विकारला असेल. मी भगिणीभाव पाळणाऱ्यांपैकी आहे. त्यामुळे त्यांनी मी सूट देते. बऱ्याचदा माणसं आरशात बघून बोलत असतात. माझ मत आहे की पहिला डाव भूताचा म्हणून सोडून दिला पाहिजे.

किशोरी पेडणेकर काय म्हणाल्या?

ज्यांना जायचं आहे त्यांनी जाऊ शकतात. अशी शब्दात पेडणेकर यांनी आपली पहिली प्रतिक्रिया दिली आहे. आम्ही सांगितलेलं आईच दुध विकू नका. उगाच हवा प्रदुशन करु नका. उद्धव ठाकरेंना कोणी त्रास देऊ नका. असे आव्हानही पेडणेकर यांनी यावेळी केली.