
महाराष्ट्रात शालेय शिक्षणात मराठी भाषा अनिवार्य करण्याचा आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास देशभर शिकवण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती देताना ठाकरे बंधूंना टोला लगावला. “ज्यांनी त्रिभाषा सूत्रातून शिक्षण घेतले, त्यांना मराठी किंवा हिंदीबाबत बोलण्याचा नैतिक अधिकार नाही,” असे भुसे म्हणाले. राष्ट्रीय शिक्षण धोरण 2020 च्या अंमलबजावणीत मराठी भाषेला प्राधान्य देण्याचा निर्णय घेण्यात आला असून, यामुळे मराठीच्या अभिजात दर्जाला आणखी बळकटी मिळणार आहे.