
महाराष्ट्रात सध्या शाळांमध्ये हिंदी भाषा सक्तीच्या मुद्द्यावरून वाद सुरू आहे. केंद्र सरकारच्या या धोरणाला कडाडून विरोध होत आहे. पण तुम्हाला माहिती आहे का, छत्रपती शिवाजी महाराजांनी सुमारे ३५० वर्षांपूर्वी मराठी भाषेवर होणारा परकीय हल्ला यशस्वीपणे परतवला होता? त्यांनी मराठीला केवळ जपलेच नाही, तर तिला सत्तेच्या केंद्रस्थानी आणून एक नवा गौरव प्राप्त करून दिला. आजच्या काळात मराठीच्या संवर्धनासाठी शिवाजी महाराजांचा हा वारसा प्रेरणादायी आहे.