
पोयनाड : नुकतेच युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळांच्या यादीत छत्रपती शिवाजी महाराजांच्या १२ किल्यांचा समावेश झाला आहे. या ऐतिहासिक निर्णयामुळे शिवप्रेमींमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. पोयनाड परिसरातील छत्रपती शिवाजी महाराज व छत्रपती संभाजी महाराज यांच्या पद स्पर्शाने पावन झालेल्या किल्ले सागरगडाचेही संवर्धन व्हावे, त्याच्या डागडुजीकडे शासनाने लक्ष द्यावे, अशी मागणी पोयनाड परिसरातील शिवप्रेमी आणि शिवप्रेमी संस्थांनी केली आहे.