नंदुरबार- दर्जेदार अन्ननिर्मितीसाठी शेतकऱ्यांना योग्य मार्गदर्शन आणि प्रशिक्षण मिळाले तर देशातील प्रत्येक गाव स्वावलंबी बनेल आणि गरिबीमुक्त होईल. त्यासाठी सरकारसोबत जनतेचा पुढाकार आवश्यक आहे. नैसर्गिक शेतीसाठी केंद्र आणि राज्य सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी आहे, असे आश्वासन केंद्रीय कृषी, शेतकरी कल्याणमंत्री तथा ग्रामीण विकासमंत्री शिवराजसिंह चौहान यांनी दिले.