
छत्रपती शिवाजी मराहाराजांचा 352 वा शिवराज्याभिषेक सोहळा आज दुर्गराज रायगडावर संपन्न होत आहे. हजारो शिवप्रेमींनी कालपासून रायगडावर जमा होण्यास सुरुवात केली आहे. आज सकाळपासूनच शिवप्रेमींची गर्दी पाहायला मिळत आहे. मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील हेही गडावर पोहोचले असून देशमुख कुटुंबही रायगडावर जाणार आहे असल्याची माहिती समोर आली आहे.