Shivrajyabhishek : शिवराज्याभिषेकामुळं काय घडलं? भारतात नव्या युगाला सुरुवात झाली

शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकामुळे केवळ महाराष्ट्राच्याच नव्हे तर भारताच्या इतिहासात एका नव्या युगाला प्रारंभ झाला.
Chhatrapati Shivaji Maharaj
Chhatrapati Shivaji Maharajesakal

Shivrajyabhishek 2024 : ६ जून १६७४ या दिवशी छत्रपती शिवाजी महाराज यांचा राज्याभिषेक पार पडला. २९ मे पासून राज्याभिषेक विधीला प्रारंभ झाला. हा सोहळा तब्बल ९ दिवस चालला. छत्रपती शिवरायांचा हा राज्याभिषेक सोहळा म्हणजे भारताच्या इतिहासातलं एक सुवर्ण पानचं! या समारंभासाठी देशाच्या वेगवेगळ्या भागातून सुमारे ११,००० लोक रायगडवर उपस्थित झाले होते. अशी माहिती डच रेकॉर्डमध्ये मिळते. महाराजांच्या या स्वराज्याला अनेक जण हिंदू पदपादशाही म्हणूनही संबोधतात.(Chhatrapati Shivaji Maharaj)

शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकामुळे केवळ महाराष्ट्राच्याच नव्हे तर भारताच्या इतिहासात एका नव्या युगाला प्रारंभ झाला. १७व्या शतकामध्ये जवळजवळ संपूर्ण भारतात एकही देशी सार्वभौम सत्ता अस्तित्वात नव्हती. दक्षिणेतील विजयनगरचे साम्राज्य लोप पावल्यानंतर शाही राजवटींना समर्थपणे झुंज देऊ शकेल अशी कोणतीही सत्ता अस्तित्वात नव्हती. अशा परिस्थितीत शून्यातून स्वराज्य निर्माण करून केवळ शाही राजवटींनाच नव्हे तर दिल्लीतील प्रबळ मुघल सत्तेलाही आव्हान केले.

पोर्तुगीज, सिद्दी आणि पाश्चात्य वखारवाले यांनाही नामोहरम केले आणि स्वतःला राज्याभिषेक करून एक समर्थ सार्वभौम मराठा राज्य उदयास आणले याची ग्वाही दिली. या घटनेमुळे शेकडो वर्षे गुलामगिरीत खितपत पडलेल्या भारतीय मनोवृत्तीला विलक्षण चेतना मिळाल्या. महाराष्ट्राच्या एका कोपऱ्यात लावलेले हे स्वराज्याचे रोपटे पहाता पहाता बहरले, कालांतराने मोठे झाले, त्याचा वृक्ष होऊन त्या वृक्षाच्या अनेकविध फांद्या भारताच्या वेगवेगळ्या भागात पसरल्या आणि मराठी राज्याचे रूपांतर मराठा साम्राज्यात झाले. हा सारा इतिहास लक्षात घेतल्यास मध्ययुगीन भारताच्या इतिहासात शिवराज्याभिषेकाची घटना सुवर्णाक्षरांनी नमूद करण्यासारखी आहे. एका वाक्यात सांगावयाचे झाले तर 'शिवराज्याभिषेकामुळे नवे युग अवतरले.

संदर्भ- छत्रपती शिवाजी महाराज (प्र. न. देशपांडे)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com