भाजपच्या मोहित कंबोज यांच्या गाडीवर 'मातोश्री'जवळ शिवसैनिकांचा हल्ला; कलानगर परिसरात गोंधळ | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

BJP Leader Mohit Kamboj

भाजप नेते मोहित कंबोज यांच्या गाडीवर शिवसैनिकांनी हल्ला केलाय.

भाजपच्या मोहित कंबोज यांच्या गाडीवर 'मातोश्री'जवळ शिवसैनिकांचा हल्ला

मुंबई : राणा दाम्पत्य विरुद्ध शिवसेना यांच्यात मुंबईत हायव्होल्टेज ड्रामा रंगलेला असतानाच शिवसैनिकांनी भाजपच्या मोहित कंबोज यांच्या गाडीवर हल्ला केलाय. रात्री सव्वा ९ वाजताच्या सुमारास शिवसैनिकांनी कंबोज यांच्या गाडीवर हल्ला केला. मोहित कंबोज यांची गाडी मातोश्रीसमोरुन जात असताना शिवसैनिकांनी मोहित कंबोज यांच्या गाडीवर हल्ला केला. कलानगर सिग्नल परिसरात मोहित कंबोज यांची गाडी थांबली होती. मोहित कंबोज यांच्याकडून या परिसराची रेकी केली जात असल्याचा आरोप केला. त्यानंतर मोहित कंबोज यांच्या गाडीवर निशाणा साधला गेलाय.

दरम्यान, पोलिसांनी तत्काळ धाव घेत मोठा अनुचित प्रकार होण्यापासून रोखलाय. यावेळी जोरदार घोषणाबाजी शिवसैनिकांकडून करण्यात आली. रवी राणा आणि नवनीत राणा यांना मदत करण्याच्या हेतून मोहित कंबोज कलानगर इथं आले असावेत, असाही एक तर्क लढवला जातोय. त्या पार्श्वभूमीवर शिवसैनिकांची हा हल्ला चढवला, अशी चर्चा रंगलीय.

हेही वाचा: श्रीनगरच्या नौगाम भागात अतिरेक्यांचा मजुरांवर गोळीबार, दोन गंभीर जखमी

राज्यात अराजकता असल्याचं हे उदाहरण असल्याचं भाजपचे विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर (Pravin Darekar) यांनी म्हंटलंय. मोहित कंबोज यांच्या गाडीवर झालेला हल्ला हा निषेधार्ह आहे, असंही त्यांनी म्हटलंय. तर दुसरीकडं शिवसेनेचे नेते विनायक राऊत (Vinayak Raut) यांनी मात्र मोहित कंबोज यांच्यावर गंभीर आरोप केलेत. रेकी करण्यासाठीच मोहित कंबोज कलानगर परिसरात आलेले होते, असं विनायक राऊत यांनी म्हंटलंय.

Web Title: Shivsainik Attack Bjp Leader Mohit Kamboj Car At Matoshree Bunglow At Mumbai

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top