श्रीनगरच्या नौगाम भागात अतिरेक्यांचा मजुरांवर गोळीबार, दोन गंभीर जखमी I Srinagar | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Jammu and Kashmir Police

आज सकाळीच जम्मू-काश्मीरमध्ये दहशतवाद्यांनी CISF बसवर हल्ला केला होता.

श्रीनगरच्या नौगाम भागात अतिरेक्यांचा मजुरांवर गोळीबार, दोन गंभीर जखमी

श्रीनगरमध्ये (Srinagar, Jammu and Kashmir) पुन्हा एकदा दहशतवाद्यांनी (Terrorists) स्थानिक मजुरांना लक्ष्य केलंय. श्रीनगरच्या नौगाममध्ये दहशतवाद्यांनी दोन मजुरांवर गोळीबार केला आणि तेथून पलायन केल्याचं वृत्त आहे. दोन्ही जखमींना जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून त्यांची प्रकृती चिंताजनक आहे. या घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी पोहोचलेल्या सुरक्षा दलाच्या जवानांनी संपूर्ण परिसराला वेढा घातला असून दहशतवाद्यांचा शोध सुरू केलाय. दहशतवाद्यांना पकडण्यासाठी संपूर्ण शहरात चेकिंग ऑपरेशन सुरू करण्यात आलंय.

आज सकाळीच जम्मू-काश्मीरमध्ये दहशतवाद्यांनी CISF बसवर हल्ला केला. पहाटे ४.१५ वाजता जम्मूतील चड्ढा कॅम्पजवळ कर्तव्यावर असलेल्या 15 सीआयएसएफ जवानांच्या बसवर दहशतवाद्यांनी हल्ला केला. या दहशतवादी हल्ल्यानंतर जवानांनीही त्यांच्यावर गोळीबार केला, त्यानंतर दहशतवादी तेथून पळून गेले. या घटनेचा तपास सुरू असतानाच श्रीनगरच्या नौगाम भागात दहशतवाद्यांनी दोन मजुरांना लक्ष्य केलंय. ही घटना घडवून आणल्यानंतर दहशतवादी या परिसरात कुठेतरी लपल्याचं वृत्त आहे.

हेही वाचा: मोठी बातमी! मुख्यमंत्री सोरेन यांच्या मालमत्तेची ईडीव्दारे होणार चौकशी

दहशतवादी हल्ल्याची माहिती मिळाल्यानंतर, जम्मू-काश्मीर पोलिसांसह (Jammu and Kashmir Police) भारतीय सुरक्षा दलांनी (Indian Security Forces) संपूर्ण परिसराला वेढा घातला असून शोध मोहीम तीव्र करण्यात आलीय. आतापर्यंत कोणत्याही दहशतवाद्याला अटक झाल्याची माहिती मिळालेली नाही. दहशतवादी हल्ल्यात जखमी झालेल्या दोन्ही मजुरांना जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून, त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याचं सांगण्यात येत आहे.

Web Title: Jammu And Kashmir Terrorists Fired Upon Two Labourers In Nowgam Area Outskirts Of Srinagar

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..