दोन हाणा,पण मला मंत्री म्हणा! राष्ट्रवादीची अब्दुल सत्तारांवर जहरी टीका | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

abdul sattar agriculture minister

दोन हाणा,पण मला मंत्री म्हणा! राष्ट्रवादीची अब्दुल सत्तारांवर जहरी टीका

शिवसेनेचे शिंदे गटातले नेते आणि राज्याचे कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांनी कार्यकर्त्यांना एक अजब सल्ला दिला आहे. कोणी एक मारली तर चार मारा असं विधान त्यांनी केलंय. तसंच कोणी अरे केलं तर त्याला कारे करा, अशा शब्दांत त्यांनी कार्यकर्त्यांना सुनावलं आहे. दरम्यान आता सत्तार वादाच्या भोवऱ्यात सापडले आहेत.

सत्तारांवर सर्व क्षेत्रातून टीका होत आहे. तर त्या विधानावर राष्ट्रवादीचे प्रवक्ते रविकांत वरपे यांनी ट्विट करत टीका केली आहे. वरपे यांनी ट्विट मध्ये लिहिले आहे की, "दोन हाणा, पण मला मंत्री म्हणा! चा विशाल दृष्टिकोन बाळगणारे मिंधे सेनेचे कट्टर हिंदुत्ववादी कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांच्या आवाहनाला सामान्य कार्यकर्त्यांनी बळी पडू नये. मराठी तरुणांना मारामारीचे सल्ले आणि तरुणांच्या रोजगाराचे महाराष्ट्रातील प्रकल्प गुजरातला. त्यामुळे सत्तार चांगलेच वादात आडकले आहेत.

अब्दुल सत्तार हे परभणीमध्ये बोलत होते. यावेळी ते कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना म्हणाले की, येणाऱ्या काळात आमच्याकडे चार-पाच आमदार आणि दोन तीन खासदारही येणार आहेत. शिवाय शिवसेनेच्या कार्यकर्त्यांना कोणी धमकावत असेल, तर त्याच्या अरेला कारे करा. त्याने एक मारली तर चार मारा. अधिकारी जर सामान्य शिवसैनिकांचं काम करत असतील तर ते त्यांच्यावर उपकार करत नाही. ते त्यांचं कर्तव्य आहे.

टॅग्स :Abdul SattarShiv SenaNCP