
शिवसेनेला मोठा झटका! माजी खासदार आनंदराव अडसूळांचा नेतेपदाचा राजीनामा
मुंबई : शिवसेनेचे माजी खासदार आनंदराव अडसूळ यांनी शिवसेना नेतेपदाचा राजीनामा दिला आहे त्यामुळे शिवसेनेला मोठा धक्का बसला आहे. अडसूळ यांनी पक्षाचे अध्यक्ष उद्धव ठाकरे यांच्याकडे राजीनाम्याचं पत्र पाठवलं आहे. त्यांनी उद्धव ठाकरे यांच्याकडे पाठवलेल्या पत्रात पक्षाबाबत खंत व्यक्त केली आहे.
(Anandrao Adsul Resign As Shivsena Leader)
अडचणीच्या काळात पक्ष आणि नेतृत्व पाठिशी न राहिल्याची भावना त्यांनी व्यक्त केली आहे. तसेच ईडीने केलेल्या कारवाईवेळी आजारपणात साधी विचारपूसही न केल्याची खंत त्यांनी व्यक्त केली. राजीनाम्यानंतर अडसूळ शिंदे गटात जाणार असल्याची माहिती मिळत आहे. तर अडसूळ यांचा मुलगा अभिजीत हा आधीपासूनच शिंदे गटासोबत आहे. या घटनेनंतर आमदारांबरोबर खासदारांचीही शिवसेना पक्षातून गळती सुरू झाल्याचं उघड झालं आहे.
हेही वाचा: पंढरपूरला जाणाऱ्या वारकऱ्यांसाठी टोल माफ; मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा
दरम्यान काल खासदार राहुल शेवाळे यांच्याकडून उद्धव ठाकरे यांच्याकडे भाजपच्या राष्ट्रपतीपदाच्या उमेदवाराला मत करण्यासाठी मागणी करण्यात आली होती. त्यांनी ठाकरेंना पत्र लिहित भाजपच्या उमेदवार मुर्मू यांना मत करावे अशी मागणी केली आहे. त्यामुळे शिंदे यांच्या बंडानंतर खासदारांच्या मनातील नाराजी बाहेर येऊ लागल्याचं पाहायला मिळत आहे. दरम्यान आज माजी खासदार आनंदराव अडसूळ यांनी शिवसेनेतील आपल्या नेतेपदाचा राजीनामा दिला आहे. त्यामुळे शिवसेनेसाठी हा मोठा धक्का आहे.
शिंदे फडणवीस सरकार स्थापन झाल्यानंतर शिवसेनेने आपल्या पदाधिकाऱ्यांच्या बैठकांना सुरूवात केली होती. पण उरल्यासुरल्या शिवसेनेच्या नेत्यांचीही खदखद आता हळूहळू बाहेर येऊ लागली आहे. दरम्यान शिंदे यांनी बंड पुकारल्यानंतर काही माजी आमदारांनीही पक्षाबद्दल खदखद व्यक्त केली आहे. तर एकूण ५५ पैकी ४० आमदारांना शिंदे गटाला समर्थन दिलं आहे. आनंदराव अडसूळ यांनी दिलेल्या राजीनाम्यामुळे शिवसेनेला मोठा झटका बसला आहे.
Web Title: Shivsena Anandrao Adsul Resign As Shivsena Leader
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..