सोमय्या हल्ला : मुद्दे संपले की, माणूस गुद्द्यांवर येतो - चंद्रकांत पाटील l Chandrakant Patil | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Kirit Somaiya,Chandrakant Patil

सोमय्या हल्ला: मुद्दे संपले की,माणूस गुद्द्यांवर येतो- चंद्रकांत पाटील

पुणे: पुणे महापालिकेच्या (Pune Corporation) जम्बो कोवीड रुग्णालयाच्या कामात भ्रष्टाचारा संदर्भात महापालिका आयुक्त विक्रमकुमार (Vikram Kumar)यांना निवेदन देण्यासाठी किरीट सोमय्या (Kirit Somaiya)आज चार वाजता आले होते. यावेळी सोमय्या यांच्यावर शिवसैनिकांनी जोरदार हल्ला केला. याचा निषेध भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी केला आहे. मुद्दे संपले की माणूस गुद्द्यावर येतो असा टोला त्यांनी महाविकास आघाडीला लगावला आहे. सोमय्या यांच्यावर हल्ला झाल्यानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला.

हेही वाचा: सरकारी वकिलांनी मागितली वेळ; नितेश राणेंची सोमवारी होणार सुनावणी

यावेळी चंद्रकांत पाटील म्हणाले, पाया खालची वाळू घसरली तर माणूस बेफाम होतो त्याला कळत नाही की आपण काय करतो. मुद्दे संपले की माणूस गुद्द्यावर येतो. यावर आम्ही कायदेशीर कारवाई करणार आहोत. आम्ही बांगड्या भरल्या नाहीत आमचा कायद्यावर विश्वास आहे अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली.

पिंपरी चिंचवडला नगरसेवक विरोधात ९२ जणांनी तक्रार केली केली तरी त्याला अटक केली नाही. महाविकास आघाडी स्वत:ला हवा तसा कायद्याचा वापर करत आहे. असा आरोपही चंद्रकांत पाटील यांनी केला आहे. पाच वर्षाचा इतिहास आहे. किरीट सोमय्या शांत बसणार नाहीत असा इशाराही चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil)यांनी आघाडीला दिला.

नेमके काय झाले

पुणे महापालिकेच्या जम्बो कोवीड रुग्णालयाच्या कामात भ्रष्टाचारासंदर्भात महापालिका आयुक्तांना निवेदन देण्यासाठी किरीट सोमय्या हे आले असता यांच्यावर शिवसैनिकांनी जोरदार हल्ला केला. सुरक्षा रक्षकांनी प्रसंगावधान राखून वेळीच गाडीत बसविले त्यामुळे सोमय्या थोडक्यात बचावले. सोमय्या यांच्या गाडीचा पाठलाग करत त्यांना महापालिकेतून हुसकावून लावून देण्यात आले. या अचानक घडलेल्या प्रसंगामुळे प्रचंड खळबळ उडाली. याचे राजकीय पडसाद ही उमटण्याची शक्यता आहे.

Web Title: Shivsena Attacked On Kirit Somaiya Comment On Chandrakant Patil Pune News

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..