Bhaskar Jadhav
Bhaskar Jadhavesakal

Bhaskar Jadhav: संताजी-धनाजींचा अर्थ कळतो का? भास्कर जाधवांचा बावनकुळेंना संतप्त सवाल

Published on

बावनकुळे यांनी एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांना संताजी-धनाजीची उपमा दिल्याने संताजी-धनाजींचा अर्थ कळतो का? असा संतप्त सवाल भास्कर जाधव यांनी केला आहे. (shivsena Bhaskar Jadhav Chandrashekhar Bawankule Devendra Fadnavis maharashtra politics crisis )

गुहागर मतदारसंघातील वस‌ई विरार क्षेत्रातील रहिवासी व स्थानिक शिवसेनेचे पदाधिकारी आणी शिवसैनीकांचा संयुक्त जाहिर मेळावा नालासोपारा पूर्व येथे शनिवारी संध्याकाळी संपन्न झाला. यावेळी शिवसेना ठाकरे गटाचे नेते आमदार भास्कर जाधव यांनी चंद्रशेखर बावनकुळेंच्या वक्तव्याचा खरपूस समाचार घेतला.

काय म्हणाले जाधव?

भास्कर जाधव यांना विचारलं असता त्यांनी बावनकुळेंना उपरोधात्मक टोला लगावला आहे. छत्रपती संभाजी महाराज यांना पकडल्यानंतर 27 वर्षे महाराजांच्या मावळ्यांनी स्वराज्याचे रक्षण केले.

मोघलांच्या गादीचा कळस कापून आणला त्यात अग्रगण्य संताजी आणि धनाजी हे होते. पण आपल्या राज्यात तर आपल्याच सत्तेला पाय उतार करणारे शिंदे आणि फडणवीस कसे संताजी धनाजी? असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला आहे.

त्यांच्या या प्रश्नाला बावनकुळे काय उत्तर देणार हे पाहणे उस्तुकत्याचे ठरणार आहे.

तसेच, शिंदे गटातील 40 आमदार स्थिर राहू नये, यासाठी स्वत: भाजप प्रयत्न करत आहे. भाजपच शिंदे गटाला सुरुंग लावणार असल्याचा थेट आरोप शिवसेना नेते भास्कर जाधव यांनी केला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com