'छत्रपतींच्या अपमानाचा बदला घेणाऱ्या आमदारांचे आभार'; शिवसेना भवनासमोर बॅनरबाजी

राज्यसभा निवडणुकीच्या उमेदवारीवरून मुख्यमंत्र्यांनी आपला शब्द पाळला नाही अशी टीका संभाजीराजे छत्रपती यांनी केली होती.
Banner
BannerSakal

मुंबई : राज्यसभेच्या निवडणुका नुकत्याच पार पडल्या असून शिवसेनेच्या एका उमेदवाराचा यामध्ये पराभव झाला. भाजपाने आपल्या तीनही जागेवर विजय मिळवत शिवसेनेच्या संजय पवार यांना धूळ चारली. त्यामुळे भाजपाने ऐनवेळी मत फोडण्यासाठी खेळी खेळल्याचं स्पष्ट झालंय. दरम्यान छत्रपती संभाजीराजे यांना पाठिंबा देण्यासाठी शिवसेनेने नकार दिला होता. शिवसेनेच्या उमेदवाराचा पराभव झाल्यावर संभाजीराजे यांनी ट्वीट करत शिवसेनेवर टीका केली होती. आता त्यांच्या समर्थकांनी शिवसेना भवनाबाहेर बॅनर लावून शिवसेनेच्या जखमेवर मीठ चोळले आहे.

(SambhajiRaje Chhatrapati)

"आज पुन्हा एकदा सिद्ध झालं महाराष्ट्र आमच्या बापाचा आहे.. छत्रपती शिवरायांचा.... शिवरायांचा गनिमी कावा वापरून छत्रपतींच्या अपमानाचा बदला घेणाऱ्या सर्व आमदार मावळ्यांचे जाहीर आभार" अशा आशयाचे बॅनर शिवसेना भवनाच्या बाहेर लावण्यात आले आहेत. "राज्यसभा तो झाकी है, स्वराज्य अभी बाकी है...जय शिवराय" असाही इशारा यातून देण्यात आला आहे. दरम्यान या बॅनरवर संभाजीराजे छत्रपती यांचा फोटो आहे.

Banner
'आमच्या हातात २ दिवस ईडी द्या, फडणवीससुद्धा शिवसेनेला मतदान करतील'

राज्यसभेच्या निवडणुकांची लगबग सुरू असताना शिवसेनेने छत्रपतींना पाठिंबा देण्यास नकार दिला होता. त्यामुळे संभाजीराजेंनी त्यावेळी एखाद्यासमोर हात पसरून मला खासदारकी नको आहे. मुख्यमंत्र्यांनी दिलेला शब्द पाळला नाही असं म्हणत निवडणुकीतून माघार घेतली होती. मुख्यमंत्र्यांनी आपला फोन उचलला नाही असं म्हणत त्यांनी शिवसेनेवर टीका करत निवडणूक लढवणार नसल्याचं स्पष्ट केलं होतं.

त्यानंतर राज्यसभेच्या निवडणुकांचा निकाल लागल्यावर संभाजीराजे यांनी ट्वीट केलं आहे. ट्वीट करून त्यांनी शिवसेनेवर टीका केली होती त्यानंतर आता समर्थकांनी शिवसेना भवनासमोर त्यांच्या नावाचा बॅनर लावला आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com