अंदाजपंचे: ठाणे, कल्याण, भिवंडीत युतीचाच विजय !

अंदाजपंचे: ठाणे, कल्याण, भिवंडीत युतीचाच विजय !

29 एप्रिलला महाराष्ट्रातील लोकसभेचे मतदान पूर्ण झाले. मतदानानंतर मात्र कोण जिंकणार कोण हरणार अशा चर्चांना उधाण आलंय. म्हणूनच आम्ही कोणत्या जागेवर कोण बाजी मारणार याचा एक अंदाज घेऊन आलो आहोत.

ठाण्यात शिवसेना गड कायम राखणार !
नरेंद्र मोदींच्या लाटेत शिवसेनेचे राजन विचारे 2014 च्या लोकसभा निवडणुकीत दोन लाख 90 हजार मतांनी ठाण्यातून निवडून आले होते. यंदा प्रचाराच्या पहिल्याच टप्प्यात लढत जिंकल्याच्या अविर्भावात युतीचे कार्यकर्ते होते; मात्र राष्ट्रवादीचे उमेदवार आनंद परांजपे यांनी प्रत्यक्ष प्रचारासह समाज माध्यमांचा पुरेपूर वापर केल्याने लढतीचा प्रवास एकतर्फीपासून "कॉंटे की टक्कर'पर्यंत पोचल्याचे चित्र असले तरी, राजन विचारे हे बाजी मारणार असून शिवसेना गड कायम राखणार असल्याचे चित्र स्पष्ट आहे.


'कल्याण' श्रीकांत शिंदेंचेच होणार !
कल्याण लोकसभा मतदारसंघामध्ये शिवसेनेचे डॉ. श्रीकांत शिंदे आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसचे बाबाजी पाटील यांच्यात मुख्य लढत आहे. पाटील यांच्या रूपात राष्ट्रवादीने आगरी कार्ड पुढे केले असले तरी कल्याण श्रीकांत शिंदेंचेच होणार अशी परिस्थीती आहे. शिवसेनेतही आगरी समाजातील नेत्यांची फळी मोठ्या प्रमाणात कार्यरत असल्याने हे कार्ड यशस्वी होईल, याबाबत साशंकता आहे. कल्याण मतदारसंघ हा युतीचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जातो. त्यामुळेच राष्ट्रवादीकडून विशेष कोणी नेता या मतदारसंघातून लढण्यास इच्छुक नव्हता. हीच युतीची जमेची बाजू ठरली, म्हणूनच कल्याणमध्ये श्रीकांत शिंदे यांचा विजय निश्चित आहे.


भिवंडीत कपिल पाटील मारणार बाजी?
भिवंडीतील यंत्रमागधारकांचे प्रश्‍न सोडविण्यात भाजपला अपयश आले असून जीएसटी, नोटाबंदी, वीज आणि पाणी या प्रश्‍नांवरून येथील नागरिकांमध्ये सत्ताधाऱ्यांविरोधात नाराजीचा सूराचा फटका कपिल पाटील यांना बसेल असे बोलले जात असले तरीही कपिल पाटील पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी कपिल पाटील यांच्यासाठी भाजप आणि शिवसेनेची बूथ यंत्रणा सक्रिय केली आहे, ही पाटील यांची जमेची बाजू आहे. भिवंडी मतदारसंघात शिवसेनेचे दोन, तर भाजपचे तीन आमदार आहेत याचाही लाभ पाटील यांना होण्याची शक्यता आहे, संख्याबळाच्या तुलणेत आणि अन्य विचार केल्यास भिवंडीत पुन्हा एकदा कपिल पाटील बाजी मारणार हे निश्चित आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com