शिवसेनेला संपविण्याचा भाजपकडून प्रयत्न - पाटील

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 29 जुलै 2019

भारतीय जनता पक्षाला अन्य राजकीय पक्ष नको आहेत. ते मित्रपक्ष असलेल्या शिवसेनेलाही संपविण्याचा प्रयत्न करीत आहेत. शिवसेनेच्या नेतृत्वाला हे कधी तरी कळेल, अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी रविवारी केली.

पुणे - भारतीय जनता पक्षाला अन्य राजकीय पक्ष नको आहेत. ते मित्रपक्ष असलेल्या शिवसेनेलाही संपविण्याचा प्रयत्न करीत आहेत. शिवसेनेच्या नेतृत्वाला हे कधी तरी कळेल, अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी रविवारी केली. 

आगामी विधानसभा निवडणुकीसाठी पुण्यासह पिंपरी- चिंचवडमधील पक्षाच्या इच्छुकांच्या मुलाखती पाटील यांनी आज घेतल्या. या वेळी खासदार वंदना चव्हाण, प्रवक्‍त्या विद्या चव्हाण, शहराध्यक्ष चेतन तुपे, महिला आघाडीच्या प्रदेशाध्यक्षा रूपाली चाकणकर आदी उपस्थित होते. शहरातील आठ विधानसभा मतदारसंघांतील ६० इच्छुकांच्या आज मुलाखती झाल्या. त्यानंतर पत्रकार परिषदेत बोलताना पाटील म्हणाले, ‘‘हिंदुत्वाच्या मुद्द्यावर शिवसेनेकडे मते वळू नयेत, यासाठी भाजप शिवसेनेला संपविण्याचा प्रयत्न करीत आहे. भाजपची प्रतिमा मलिन झाली असून, जनता फोडाफोडीच्या राजकारणाला थारा देणार नाही. लोकांच्या मनात आता राग आहे, तो निवडणुकीच्या निकालातून दिसेल.’’ 

‘पिंपरी- चिंचवड शहरातील इच्छुकांच्या मुलाखती घेण्यासाठी पार्थ पवार आले होते. पार्थ यांनी लोकसभा निवडणुकीसाठी मुलाखत दिली होती. आता रोहित पवार यांनीही विधानसभा निवडणुसाठी मुलाखत दिली आहे,’’ असेही पाटील यांनी नमूद केले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Shivsena BJP Jayant Patil Politics