
मुंबई : शिवसेनेच्या जाहीर सभेचा टीझर रिलीज करण्यात आला असून १४ मे रोजी बीकेसी मैदानावर शिवसेनेची जाहीर सभा होणार आहे. "या वेळी 'खऱ्या हिंदुत्वाचा' आवाज ऐकायला या" असं सांगत शिवसेनेने आपल्या सभेचा टीझर रिलीज केला आहे.
(Shivsena Sabha Teaser Release)
शिवसेनेच्या खऱ्या हिंदुत्वाचा आवाज ऐकायला आपल्या सर्वांना यायला लागतंय असं आवाहन करत शिवसेनेने आपल्या सभेचा टीझर प्रदर्शित केला असून १४ मे रोजी मुंबईतील बीकेसी मैदानावर सायंकाळी सात वाजता ही सभा होणार आहे.
दरम्यान आज शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी आदित्य ठाकरे यांच्या आयोध्या दौऱ्याचा मुहूर्त जाहीर केला आहे. १० जून ला शिवसेनेचे आदित्य ठाकरे आयोध्येला जाणार असून हा राजनैतिक दौरा नसल्याचं त्यांनी सांगितलं आहे. त्यानंतर आता शिवसेनेने आपल्या १४ तारखेला होणाऱ्या सभेचा टीझर प्रदर्शित केला आहे.
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या औरंगाबादेतील सभेनंतर राज्यात तणाव निर्माण झाला होता. भोंग्याच्या वादावरुन गृहखात्याने आणि पोलिस खात्याने सतर्कता दाखवली होती. त्यानंतर राज ठाकरे आणि मनसेच्या काही कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल झाले होते.
सध्या राज्यभर भोंग्याच्या वादावरुन तणाव पसरला असून भाजपा आणि शिवसेनेचे आरोप प्रत्यारोप चालू आहेत. भाजपाच्या बूस्टर डोस सभेत देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेनेवर आणि शरद पवार यांच्यावर सडकून टीका केली होती तर राज ठाकरे यांनी औरंगाबादेच्या सभेत सरकारवर टीका केली होती. त्यानंतर शिवसेनेने आपल्या हिंदुत्वाची डरकाळी देत १४ मे रोजी सभा आयोजित केली आहे. त्याचा टीझर आज शिवसेनेच्या अधिकृत ट्वीटरवर प्रदर्शित करण्यात आलेला आहे.