Shivsena: चंद्रकांत खैरे म्हणजे वाया गेलेली केस - गुलाबराव पाटील | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Chandrakant Khaire

Shivsena: चंद्रकांत खैरे म्हणजे वाया गेलेली केस - गुलाबराव पाटील

औरंगाबाद : केंद्रीय निवडणूक आयोगाने शिवसेनेचे पक्षचिन्ह गोठल्याने शिंदे गट आणि ठाकरे गटाच्या नेत्यांनी एकमेकांवर आरोप प्रात्यारोप सुरू केले आहेत. तर औरंगाबादचे माजी खासदार चंद्रकांत खैरे यांनी गद्दाराने पाप केल्यामुळे निवडणूक चिन्ह गोठवलं गेलं असा आरोप केला होता. त्यानंतर शिंदे गटाचे नेते गुलाबराव पाटील यांनी त्यांच्यावर जोरदार टीका केली.

(Gulabrao Patil On Chandrakant Khaire)

"पंतप्रधान असलेल्या नरेंद्र मोदी यांनी सगळ्या यंत्रणा आपल्या ताब्यात घेतल्या आहेत. तर फडणवीसांना हा सगळा डाव रचलाय. फडणवीस आणि नरेंद्र मोदी हे एकमेकांचे खास आहेत. एकनाथ शिंदेंनी शिवसेना फोडली हे खूप मोठं पाप केलं. पण निवडणूक आयोगाच्या निर्णयानंतर शिवसैनिकांचं मन दुखावलं आहे. आम्ही उद्धव ठाकरे साहेबांच्या सोबत आहोत" असं चंद्रकांत खैरे म्हणाले आहेत.

हेही वाचा: Sharad Pawar : "ज्याची भिती होती..."; सेनेचे चिन्ह गोठवल्यानंतर पवारांची प्रतिक्रिया

त्यानंतर शिंदे गटाचे मंत्री गुलाबराव पाटील यांनी चंद्रकांत खैरे यांचा चांगलाच समाचार घेतला आहे. चंद्रकांत खैरे म्हणजे वाया गेलेली केस आहे त्यांच्याविषयी काय बोलणार? अशी मिश्किल टीका पाटलांनी केली आहे. तर शिंदे यांनी बंड केल्यानंतर चंद्रकांत खैरे आणि गुलाबराव पाटील यांच्यात अनेकवेळा शाब्दिक वादावादी झाली आहे.

दरम्यान, एकनाथ शिंदे यांनी बंड केल्यानंतर शिवसेना आपली आणि पक्षचिन्हही आपलंच असल्याचा दावा केला होता. त्यानंतर हा वाद निवडणूक आयोगाकडे गेला होता. तर आता निवडणूक आयोगाने शनिवारी निर्णय देत धनुष्यबाण हे चिन्ह गोठवलं आहे. त्यामुळे उद्धव ठाकरे यांना मोठा धक्का बसला आहे. तर अंधेरी येथील पोटनिवडणुकीसाठी दुसरे चिन्ह देण्याची मागणी निवडणूक आयोगाने केली आहे.