...म्हणून, बच्चन आणि संजय दत्त आहेत बाळासाहेब ठाकरेंचे ऋणी

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 23 जानेवारी 2020

संजय दत्तला दिला पाठिंबा
अभिनेता संजय दत्तवर मुंबई बॉम्बस्फोट प्रकरणात आरोप होते. संजय दत्त हा काँग्रेस नेते सुनील दत्त यांचा मुलगा. काँग्रेस आणि शिवसेना एकमेकांच्या विरोधात लढत होती.

मुंबई : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी आयुष्यात अनेकांना मदत केली. अनेक तळागाळातील माणसांना समाजात मानाचं स्थान मिळवून दिलं. मुंबईत मराठी माणसाला अन्यायाविरुद्ध उभं रहायला शिकवलं. त्यांचे उपकार असणारे मुंबई आणि महाराष्ट्रात लाखो लोक आहेत. त्यात बॉलिवूडमधीलही अनेक कलाकारांचा समावेश आहे. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्यामुळं बॉलिवूडमधील दोन दिग्गज कलाकारांना आज पुन्हा उभं राहता आलंय. त्यात महानायक अमिताभ बच्चन आणि अभिनेता संजय दत्त यांचा समावेश आहे. या दोन्ही कलाकारांना मोठ्या अडचणीतून बाहेर काढण्यात बाळासाहेब ठाकरे यांनीच मदत केली. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

अमिताभ यांचा जीव वाचला
अमिताभ बच्चन यांना कुली सिनेमाच्या शुटिंगच्या वेळेस दुखापत झाली होती. सिनेमातील एक ऍक्शन सिनचं शुटिंग सुरू असताना बच्चन यांना पोटात दुखापत झाली. त्यावेळी अमिताभ अक्षरशः मृत्यूच्या दारात होते. त्यावेळी सेटवरून त्यांना रुग्णालयात नेण्यासाठी शिवसेनेची ऍब्युलन्स आली होती. ही घटना 2 ऑगस्ट 1982ची होती. त्यावेळी मोबाईलच नव्हे तर, फोनची सुविधाही नव्हती. त्या काळात वेळेत ऍम्ब्युलन्स मिळाल्यामुळं अमिताभ यांना हॉस्पिटलमध्ये वेळेत उपाचारांसाठी दाखल करता आलं. त्यामुळं अमिताभ यांचा जीव वाचला. निव्वळ शिवसेना होती म्हणूनच, अमिताभ यांचा त्यावेळी जीव वाचला. अमिताभ यांनी अनेक सार्वजनिक कार्यक्रमांमध्ये याचा उल्लेख केला आहे. बाळासाहेब ठाकरे आणि त्यांच्या शिवसेनेमुळं मी आज जिवंत असल्याचं अमिताभ यांनी जाहीरपणे सांगितलयं.

संजय दत्तला दिला पाठिंबा
अभिनेता संजय दत्तवर मुंबई बॉम्बस्फोट प्रकरणात आरोप होते. संजय दत्त हा काँग्रेस नेते सुनील दत्त यांचा मुलगा. काँग्रेस आणि शिवसेना एकमेकांच्या विरोधात लढत होती. पण, तरीही शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे कठीण प्रसंगामध्ये सुनील दत्त आणि संजय दत्त यांच्या पाठिशी उभे राहिले. संजय दत्त आणि सुनील दत्त यांनी बाळासाहेब ठाकरे यांची मातोश्रीवर जाऊन भेट घेतली होती. त्यावेळी संजय दत्त प्रामाणिक असल्याचं सांगण्यासाठी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे पुढं आले होते. संजय दत्तनेही बाळासाहेब ठाकरे यांच्या त्या मदतीचा उल्लेख अनेक कार्यक्रमांमध्ये केलाय.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Shivsena chief Balasaheb Thackeray birth anniversary