ठाकरेंना धक्का! CM शिंदेंकडून शिवसेनेच्या नवीन नियुक्त्या जाहीर | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Shivsena cm Eknath Shinde announced New appointments of Shiv Sena uddhav thackeray

ठाकरेंना धक्का! CM शिंदेंकडून शिवसेनेच्या नवीन नियुक्त्या जाहीर

मुंबई : एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर शिवसेनेला मोठे खिंडार पडले आहे, यानंतर शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांना रोजच नवे धक्के बसत आहेत. शिवसेना कोणाची यावरून देखील शिंदे गट आणि ठाकरे यांच्यात वाद सुरू आहे. दरम्यान शिवसेनेच्या अनेक आमदार खासदार तसेच स्थानिक नेत्यांनी शिंदे गटाची वाट धरली आहे. यादरम्यान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून आज शिवसेनेच्या नवीन पदांची नियुक्ती जाहीर करण्यात आली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याहस्ते ही नियुक्तीपत्रे आज प्रदान करण्यात आली. यामुळे उद्धव ठाकरे यांना आणखी एक धक्का बसला आहे.

मुख्यमंत्री शिंदे यांच्याकडून शिवसेनेच्या सचिवपदी कामगार नेते किरण पावसकर यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. तर ठाण्याचे माजी महापौर संजय मोरे यांची शिंदे यांनी सचिव पदावर नियुक्ती केली आहे. या आधी जाहीर करण्यात आल्याप्रमाणे आमदार दिपक केसरकर यांची पक्षाच्या मुख्य प्रवक्तेपदी नियुक्ती कायम राहणार आहे.

याशिवाय शिवसेना उपनेते गुलाबराव पाटील, शिवसेना उपनेते आणि आमदार उदय सामंत, किरण पावसकर, आमदार गुलाबराव पाटील आणि दहिसरच्या माजी नगरसेविका शीतल म्हात्रे यांची प्रवक्तेपदी निवड करण्यात आलेली आहे. तर अंबरनाथचे आमदार डॉ. बालाजी किणीकर यांची पक्षाच्या खजिनदारपदी नियुक्ती करण्यात आली आहे.

हेही वाचा: आरेतील वृक्षतोडीला SC मध्ये आव्हान, सरन्यायाधिशांचे महत्वाचे निर्देश

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याहस्ते ही नियुक्तीपत्रे किरण पावसकर आणि संजय मोरे याना देण्यात आली. तर बाकी शिलेदराना देखील ती लवकरच देण्यात येतील. या नियुक्त्यांमुळे पक्षाचे काम अधिक जोमाने करता येणे शक्य होणार असून पक्ष विस्तारासाठी देखील हा निर्णय फायदेशीर ठरणार आहे.

हेही वाचा: पुण्यात शिवसेनेचे बळ वाढणार! सुषमा अंधारे उद्या बांधणार शिवबंधन

Web Title: Shivsena Cm Eknath Shinde Announced New Appointments Of Shiv Sena Uddhav Thackeray

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top