Dasara Melava: शिंदे गटाने दसरा मेळाव्यासाठी बदलला 'भगवा': जाणून घ्या | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

shinde Group Dasara Melava

Dasara Melava: शिंदे गटाने दसरा मेळाव्यासाठी बदलला 'भगवा': जाणून घ्या

shinde Group Dasara Melava : दसरा मेळाव्याच्या वादात हायकोर्टाने शिवाजी पार्क ठाकरेंच्या शिवसेनेच्या पारड्यात टाकलं आहे. दरम्यान शिंदे गट आता बीकेसीतल्या मैदानावर दसरा मेळावा घेणार आहे. त्यामुळे आता इतिहासात पहिल्यांदाच शिवसेनेचे दोन दसरा मेळावे होणार आहेत. यासाठी आता शिंदे गट जोरदार शक्तिप्रदर्शन करणार आहे.

शिंदे गट राज्यभरातून लाखो कार्यकर्ते मुंबईत आणण्याच्या तयारीत आहे. शिंदे गटाकडून हजारहून अधिक बसेस बुक केल्या असल्याचे सांगितले जात आहे. तर विदर्भातून तीन रेल्वे बुक केल्या आहेत. त्यामुळे मेळाव्याला गर्दी होणार हे फिक्स झाले आहे. दरम्यान शिंदे गटाकडून दसरा मेळाव्यासाठी झेंड्यामध्ये बदल करणार आहेत.

हेही वाचा: शिवसेनेच्या इतिहासात एकच दसरा मेळावा होतो, तो म्हणजे शिवाजी पार्कवर- उद्धव ठाकरे

शिंदे गटाच्या दसरा मेळाव्यात शिवसेनेच्या पारंपारिक भगव्या झेंड्यामध्ये बदल करण्यात येणार असल्याचे कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांनी माहिती दिली आहे. शिंदेंच्या दसरा मेळाव्यासाठी झेंड्याचा रंग भगवाच असेल,पण त्यावर बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिघे यांचे फोटो असणार आहेत.

शिंदे गटाच्या दसरा मेळाव्यासाठी एक लाख झेंडे बनवण्यात येणार आहेत,अशी माहिती अब्दुल सत्तार यांनी दिली. शिवसेनेचे दोन्ही दसरा मेळावे जवळपास आहेत,त्यामुळे आपले कार्यकर्ते कोण, हेओळखता यावं,म्हणून भगव्या झेंड्यामध्ये थोडा बदल केल्याचं अब्दुल सत्तार म्हणाले.