esakal | Shivsena Dasara Melawa 2021 : ठाकरेंची तोफ कुणाकुणावर धडाडणार? राज्याचे लक्ष
sakal

बोलून बातमी शोधा

uddhav thackeray

Shivsena Dasara Melawa 2021 :ठाकरेंची तोफ कुणाकुणावर डागणार?

sakal_logo
By
टीम-ईसकाळ

मुंबई : दसऱ्याच्या निमित्तानं शिवसेनेचा दसरा मेळावा (Shivsena Dasara Melawa 2021) मुंबईत पार पडणार आहे. या मेळाव्यात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (uddhav thackeray) काय बोलणार? याकडे राज्याचे लक्ष लागले आहे. आगामी महानगरपालिका (muncipal elections) निवडणुका डोळ्यांसमोर ठेवत सैनिकांसाठी हा मेळावा अत्यंत महत्वाचा मानला जातोय. राज्यात महाविकास आघाडीचं सरकार असल्यानं उद्धव ठाकरेंच्या निशाण्यावर राज्यातले आणि केंद्रातले भाजपचे नेते असतील असं म्हटलं जातंय.

यंदाचा सोहळा षण्मुखानंद सभागृहात

गेली अनेक वर्ष शिवाजी पार्कच्या मैदानात ठाकरेंची तोफ धडधडायची. पण यंदा हा सोहळा षण्मुखानंद सभागृहात होणार आहे. त्यामुळे हजारोंच्या संख्येने भाषण देणाऱ्या ठाकरेंना यंदा मोजक्याच लोकांसमोर भाषण करावं लागणार आहे. पण महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यात पोहचण्यासाठी ॲानलाईनची व्यवस्था ठेवण्यात आली आहे. या मेळाव्याला शिवसेनेचे नेते, मंत्री, आमदार विभागप्रमुख, महापौर आणि महापालिकेतले महत्वाचे नेते उपस्थित राहणार आहेत.

हेही वाचा: आज भगवान गडावर दसरा मेळावा, पंकजा मुंडेंच्या निशाण्यावर कोण?

ठाकरे कोणाकोणाचा घेणार समाचार?

गेल्या अनेक दिवसांपासून केंद्रीय यंत्रणा राज्यातल्या विविध नेत्यावर कारवाई सुरु आहे. ईडी, सीबीआय आणि आता एनसीबीच्या कारवाईवरही प्रश्नचिन्ह निर्माण केलं गेलं आहे. लखीमपूर प्रकरणात केंद्र सरकारचा चिडीचूपपणा, महाराष्ट्र बंद शेतकरीविरोधी धोरणं यावर उद्धव ठाकरे आवर्जुन बोलणार का? यावर देखील चर्चा सुरू आहे. राज्यातल्या शेतकरी धोरणं जाहीर करतील. कोरोना काळात मुंबई महाराष्ट्र वगळता ॲाक्सिजन आणि लसीवरून राजकारणावरही उद्धव ठाकरे जाहिरपणे बोलले, गेल्या अनेक महिन्यांपासून राज्यपाल नियुक्त सदस्यांची नावं भगतसिंग कोश्यारी मंजूर करत नाहीत. तसेच विविध धोरणात राज्यपाल आणि सरकारमध्ये एकमत नसतानाचे बरेच किस्से आहेत. त्यामुळे ठाकरे राज्यपालांचाही समाचार घ्यायला विसरणार नाहीत.

loading image
go to top