शिवसेनेचे ठरलं; ग्रामीण भागाला प्राधान्य आणि दर दोन वर्षांनी...

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 30 डिसेंबर 2019

शिवसेनेने मुंबईतून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, सुभाष देसाई यांच्यासह फक्त अनिल परब यांना संधी दिली आहे. त्यानंतर गुलाबराव पाटिल, संजय राठोड, उदय सामंत, दादा भुसे, शंभुराज देसाई, संदिपान भुमरे यांच्या बरोबरच अब्दुल सत्तार या नव्या शिवसैनिकालाही स्थान देण्यात आले आहे.

मुंबई : राज्यातील महाविकास आघाडी सरकारचा पहिला मंत्रिमंडळ विस्तार आज (ता. 30) पार पडत असून, शिवसेनेने आपल्या मंत्र्यांची अंतिम यादी जाहीर केली आहे. शिवसेनेने आठ नव्या चेहऱ्यांना संधी देताना, दर दोन वर्षांनी मंत्री बदलण्याचा निर्णय घेतला आहे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप
 
शिवसेनेने दोन वर्षांनी मंत्री बदलत ग्रामीण भागाला सर्वाधिक प्राधान्य दिले आहे. शिवसेनेने मुंबईतून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, सुभाष देसाई यांच्यासह फक्त अनिल परब यांना संधी दिली आहे. त्यानंतर गुलाबराव पाटिल, संजय राठोड, उदय सामंत, दादा भुसे, शंभुराज देसाई, संदिपान भुमरे यांच्या बरोबरच अब्दुल सत्तार या नव्या शिवसैनिकालाही स्थान देण्यात आले आहे. यासह शिवसेनेने शंकरराव गडाख आणि बच्चू कडू या सहयोगी आमदारांनाही मंत्रीपद दिले आहे. 

ठाकरे दरबाराचा आज महा"विस्तार' 

या मंत्रिमंडळ विस्तारात काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या संभाव्य मंत्र्यांची नावे निश्‍चित झाले आहेत. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या पक्षाच्या बैठकीत खातेवाटपासंदर्भात चर्चा करण्यात आली. या बैठकीत उपमुख्यमंत्रिपदासाठी पक्षाचे नेते अजित पवार यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाल्याचे सूत्रांकडून कळते. गृहमंत्रिपद कोणाकडे जाणार, हे विस्तारानंतरच स्पष्ट होईल, असे सूचक वक्तव्य अर्थमंत्री जयंत पाटील यांनी माध्यमांशी बोलताना केले आहे. नव्या मंत्रिमंडळात युवा आणि अनुभवी अशा दोन्ही नेत्यांना संधी दिली जाण्याची शक्‍यता आहे. मंत्रिमंडळामध्ये प्रादेशिक तसेच सामाजिक समतोल साधण्याचाही प्रयत्न केला आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Shivsena finalize ministers list for cabinet expansion in Maharashtra