ठाकरे दरबाराचा आज महा"विस्तार' 

सकाळ न्यूज नेटवर्क
सोमवार, 30 डिसेंबर 2019

राज्यातील महाविकास आघाडीच्या सरकारचा पहिला मंत्रिमंडळ विस्तार उद्या (ता. 30) पार पडणार आहे. या पार्श्‍वभूमीवर तिन्ही पक्षांनी जोरदार तयारी केली आहे. कॉंग्रेसच्या संभाव्य मंत्र्यांची नावे निश्‍चित करण्यासाठी प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी दिल्लीदरबारी धाव घेतली, तर राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या अध्यक्षतेखाली आज झालेल्या बैठकीत राष्ट्रवादीतील खातेवाटपासंदर्भात चर्चा करण्यात आली.

जुन्यांप्रमाणेच नव्यांनाही मिळणार संधी 
मुंबई - राज्यातील महाविकास आघाडीच्या सरकारचा पहिला मंत्रिमंडळ विस्तार उद्या (ता. 30) पार पडणार आहे. या पार्श्‍वभूमीवर तिन्ही पक्षांनी जोरदार तयारी केली आहे. कॉंग्रेसच्या संभाव्य मंत्र्यांची नावे निश्‍चित करण्यासाठी प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी दिल्लीदरबारी धाव घेतली, तर राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या अध्यक्षतेखाली आज झालेल्या बैठकीत राष्ट्रवादीतील खातेवाटपासंदर्भात चर्चा करण्यात आली. दरम्यान, गृहमंत्रिपद कोणाकडे जाणार हे विस्तारानंतरच स्पष्ट होईल, असे सूचक वक्तव्य अर्थमंत्री जयंत पाटील यांनी माध्यमांशी बोलताना केले आहे. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

नव्या मंत्रिमंडळात युवा आणि अनुभवी अशा दोन्ही नेत्यांना संधी दिली जाण्याची शक्‍यता आहे. मंत्रिमंडळामध्ये प्रादेशिक तसेच सामाजिक समतोल साधण्याचाही प्रयत्न केला जाईल. तत्पूर्वी 28 नोव्हेंबर 2019 रोजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासह एकनाथ शिंदे, सुभाष देसाई, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे जयंत पाटील, छगन भुजबळ, कॉंग्रेसचे बाळासाहेब थोरात आणि डॉ. नितीन राऊत यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली होती. आता उद्याच्या मंत्रिमंडळ विस्तारात शिवसेनेचे 13 मंत्री शपथ घेणार आहेत, त्यामध्ये 10 कॅबिनेट आणि तीन राज्यमंत्र्यांचा समावेश असू शकतो. राष्ट्रवादीचे 13 मंत्री शपथ घेणार आहेत, त्यामध्ये दहा कॅबिनेट आणि तीन राज्यमंत्री शपथ घेऊ शकतात. कॉंग्रेसचे 12 मंत्री शपथ घेणार आहेत, त्यामध्ये 10 कॅबिनेट आणि दोन राज्यमंत्री आहेत. मंत्रिमंडळ विस्तारात काही खाती रिक्त ठेवण्यात येतील, अशी माहिती आधी मिळत होती. मात्र, आता सर्व खाती भरण्यात येतील, असे सांगितले जात आहे.

अजित पवारांना गृह तर धनंजय मुंडेना मिळणार 'हे' खाते 

संभाव्य मंत्री 
राष्ट्रवादी कॉंग्रेस 
पश्‍चिम महाराष्ट्र - अजित पवार, दिलीप वळसे- पाटील, हसन मुश्रीफ, बाळासाहेब पाटील, दत्ता भरणे 
विदर्भ - अनिल देशमुख, डॉ. राजेंद्र शिंगणे 
ठाणे - जितेंद्र आव्हाड 
मुंबई - नवाब मलिक 
मराठवाडा - धनंजय मुंडे, राजेश टोपे 
कोकण - अदिती तटकरे 
उत्तर महाराष्ट्र - डॉ. किरण लहामटे 

कॉंग्रेस 
उत्तर महाराष्ट्र - के. सी. पाडवी 
मराठवाडा - अशोक चव्हाण, अमित देशमुख 
पश्‍चिम महाराष्ट्र - सतेज पाटील, विश्वजित कदम, संग्राम थोपटे, प्रणिती शिंदे 
विदर्भ - विजय वडेट्टीवार, यशोमती ठाकूर 
मुंबई - वर्षा गायकवाड किंवा अमिन पटेल 

शिवसेना 
मुंबई - अनिल परब, रवींद्र वायकर, सुनील प्रभू, सुनील राऊत 
कोकण - उदय सामंत किंवा भास्कर जाधव, वैभव नाईक किंवा दीपक केसरकर 
पश्‍चिम महाराष्ट्र - अनिल बाबर, शंभुराजे देसाई, प्रकाश अबिटकर 
मराठवाडा - संजय शिरसाट किंवा अब्दुल सत्तार, तानाजी सावंत 
विदर्भ - आशिष जैस्वाल किंवा संजय रायमुलकर, बच्चू कडू, संजय राठोड 
ठाणे - प्रताप सरनाईक 
उत्तर महाराष्ट्र - गुलाबराव पाटील, दादा भुसे किंवा सुहास कांदे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Thackeray government expansion politics