सामान्य शेतकरी कुटुंबातील मुलगा झाला कृषीमंत्री! 

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 5 जानेवारी 2020

दादा भुसे ठरले वजनदार नेते 
आमदार दादा भुसे हे सामान्य शेतकरी कुटुंबातील असल्याने त्यांना राजकीय पार्श्‍वभूमी नव्हती. त्यांच्या मतदारसंघात हिरे घराण्याचे राजकीय ताकद असताना त्यांनी स्वतःला सिद्ध केले आहे.

मुंबई : राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या मंत्रिमंडळ विस्तारात मालेगांव बाह्यचे आमदार दादा भुसे यांना कृषीमंत्रीपदाची जबाबदारी देण्यात आली. राज्यातील शेतकऱ्यांच्या आत्महत्येवरून सर्वांच्या नजरेत पहिल्यांदा येणाऱ्या या खात्याची जबाबदारी शिवसेनेच्या दादा भुसेंकडे असणार आहे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

दादा भुसे यांनी युती सरकारच्या काळात राज्यमंत्री म्हणून काम केले आहे. आता त्यांना कॅबिनेट मंत्रीपदावर बढती मिळाली. तसेच त्यांच्याकडे कृषी मंत्रीपदासारखी  जबाबदारी देण्यात आली आहे. महाविकास आघाडी सरकारने महात्मा फुले शेतकरी कर्जमाफीची घोषणा केली असून, शेतकऱ्यांना याचा फायदा होण्याची मोठी जबाबदारी भुसे यांच्याकडे असणार आहे.

अजित पवारांना अर्थमंत्रीपद, तर वळसे पाटील आणि दत्ता भरणेंना 'ही' खाती

नाशिक जिल्ह्यात दिलीप बनकर, माणिकराव कोकाटे, नरहरी झिरवाळ यांसह सरोज आहिरे यांच्या नावाची चर्चा होती मात्र या सर्व मागे टाकून भुसे यांनी मंत्रिमंडळात स्थान मिळविले होते. नाशिक जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेसने सर्वाधिक सहा जागांवर बाजी मारली होती. त्यामुळे मंत्रिमंडळात राष्ट्रवादी पक्षाकडून कमीतकमी एखादे राज्यमंत्रिपद मिळेल अशी अपेक्षा होती. 

अखेर खातेवाटप जाहीर; 'या' मंत्र्यांकडे असतील 'ही' खाती

दादा भुसे ठरले वजनदार नेते 
आमदार दादा भुसे हे सामान्य शेतकरी कुटुंबातील असल्याने त्यांना राजकीय पार्श्‍वभूमी नव्हती. त्यांच्या मतदारसंघात हिरे घराण्याचे राजकीय ताकद असताना त्यांनी स्वतःला सिद्ध केले आहे. सलग चौथ्यांदा विजयी झाल्यानंतर कॅबिनेट मंत्रीपदी बढती मिळालेले भुसे आता कृषीमंत्री झाले आहेत.

पुण्याच्या जावयाला मिळाली गृहमंत्रिपदाची जबाबदारी, पाहा कोण?


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Shivsena leader Dada Bhuse will be new agriculture minister in Maharashtra Government