esakal | खळबळजनक! 'शिवसेना नेत्यानेच अनिल परबांविरोधातील माहिती किरीट सोमय्यांना पुरविली?'
sakal

बोलून बातमी शोधा

anil parab

खळबळजनक! 'शिवसेना नेत्यानेच परबांविरोधातील माहिती सोमय्यांना पुरविली?'

sakal_logo
By
टीम ई सकाळ

मुंबई : परवहन मंत्री अनिल परब (anil parab) यांच्याविरोधातील माहिती ही शिवसेना (shivsena) नेत्यानेच भाजप नेते किरीट सोमय्यांना पुरविल्याचा खळबळजनक आरोप मनसेकडून करण्यात आला आहे. यासंदर्भातील ऑडिओ क्लिप मनसेने समोर आणल्या आहेत. शिवसेना नेते रामदास कदम यांनी सोमय्यांना रसद पुरविल्याचा थेट आरोप माजी आमदार संजय कदम आणि मनसे सरचिटणीस वैभव खेडेकर यांनी केला आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळात एकच खळबळ निर्माण झाली आहे.

हेही वाचा: गांधी जयंतीला 'गोडसे जिंदाबाद' टि्वट करणाऱ्यांना वरुण गांधींनी सुनावलं

एक ऑडिओ क्लिप समोर आली आहे. त्या क्लिपमध्ये माजी मंत्री रामदास कदम आणि प्रसाद कर्वे यांचा आवाज असल्याचा मनसेचा आरोप आहे. तसेच दुसऱ्या ऑडिओ क्लिपमध्ये प्रसाद कर्वे हे भाजप नेते किरीट सोमय्या यांच्याशी संवाद साधत असल्याचे सांगितले जात आहे.

पहिल्या ऑडिओ क्लिपमध्ये 'अनिल परब यांच्या वांद्रे येथील कार्यालयावर काय कारवाई झाली? अशी विचारणा एक व्यक्ती करताना दिसतो. त्यावर सोमय्या म्हणतात, 'निकाल लागला आहे. त्याची ऑर्डर झाली. आपण केस जिंकलो. म्हाडाने एका महिन्यात कार्यालय पाडण्याचं मान्य केलं', असं किरीट सोमय्या म्हणतात. या ऑडिओ क्लिपमधील आवाज हा प्रसाद कर्वे यांचा असल्याचा आरोप आहे.

दुसऱ्या ऑडिओ क्लिपमध्ये 'अनिल परब यांचं कार्यालय तोडण्याची तयारी झाली', असं एक व्यक्ती बोलतो. त्यानंतर जो आवाज रामदास कदम यांचा असल्याचा आरोप आहे, ते व्यक्ती म्हणतात, 'चांगलं झालं. आता अनिल परब यांना राजीनामा द्यावा लागेल'. तसेच 'किरीट सोमय्या आले का. त्याला घेऊन तू किती वाजता येणार आहे. तिथून निघताना मला फोन कर.'

दरम्यान, रामदास कदम यांनी हे सर्व आरोप फेटाळून लावले आहेत.

loading image
go to top