esakal | संजय राऊत बारामतीत? भेटीच्या चर्चेला उधाण
sakal

बोलून बातमी शोधा

संजय राऊत बारामतीत? भेटीच्या चर्चेला उधाण

- शिवसेनेचे खासदार संजय राऊत शरद पवारांच्या भेटीला बारामतीत. 

संजय राऊत बारामतीत? भेटीच्या चर्चेला उधाण

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

बारामती शहर : शिवसेनेचे खासदार संजय राऊत शरद पवारांच्या भेटीसाठी बारामतीत आल्याच्या अफवेने आज काही तास चर्चेला उधाण आले होते. माध्यमांच्या प्रतिनिधींना अनेकांनी फोन करुन संजय राऊत बारामतीत आले आहेत काय? अशी चौकशी केली. 

शिवसेना, राष्ट्रवादी व कॉंग्रेस असे सरकार बनणार, अशी चर्चा विधानसभा निवडणूकीच्या निकालानंतर सोशल मिडीयावर जोरदार रंगली होती. 

या बाबत शिवसेनेची बार्गेनिंग पॉवर वाढल्याचेही चित्र निर्माण झाले होते. मात्र, ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी काल स्पष्टपणे ही शक्यता फेटाळून लावत आम्ही विरोधी बाकांवरच बसणार असल्याचा खुलासा केल्यानंतर या चर्चा थंडावल्या.

मात्र शिवसेनेला मुख्यमंत्रीपद मिळाले नाही तर उध्दव ठाकरे शरद पवार यांची मदत घेऊ शकतील का या बाबत तर्कवितर्कांना उत आला आहे. 

खासदार संजय राऊत व शरद पवार यांचे घनिष्ठ संबंध विचारात घेऊन संजय राऊत या संदर्भात मध्यस्थ म्हणून काही चर्चा करणार का? अशीही शक्यता वर्तविली जात होती. 

काल आणि आजही संजय राऊत बारामतीत आल्याची जोरदार चर्चा होती. गोपनीय भेट असल्याचे काही कार्यकर्ते सांगत होते, मात्र माहिती घेतली असता असे काहीही नव्हते हेच समोर आले. बारामतीत मात्र दिवसभर या चर्चेने धमाल केली.