esakal | संजय राऊत यांचं नवं ट्विट, पाहा काय म्हणाले!
sakal

बोलून बातमी शोधा

nawab.jpg

सध्या राज्यात हायहोल्टेज ड्रामा सुरू आहे. महाआघाडीचे सरकार स्थापन होणार याची संपूर्ण तयारी झाली असतानाच  
अजित पवार यांनी बंड करत भाजपसोबत जात उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. यामुळे सध्या राजकीय  वातारण तापले आहे.

संजय राऊत यांचं नवं ट्विट, पाहा काय म्हणाले!

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

मुंबई : सध्या राज्यात गंभीर राजकीय स्थिती निर्माण
झाली आहे. प्रत्येक क्षणाक्षणाला काहीतरी घडामोडी घडत आहेत. रोजच्या प्रमाणे शिवसेना नेते संजय राऊत आणि राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक यांनी व्टिट करत भाजपला टोला हाणला आहे.

सध्या राज्यात हायहोल्टेज ड्रामा सुरू आहे. महाआघाडीचे सरकार स्थापन होणार याची संपूर्ण तयारी झाली असतानाच  
अजित पवार यांनी बंड करत भाजपसोबत जात उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली.

यामुळे राज्यात एकच खळबळ उडाली. नबाव मलिक यांनी आज व्टिट करत अगर फलक को जिद है बिजलियाँ गिराने की, तो हमें भी जिद है वहीं पर आशियाँ बसाने की ... हम होंगें कामयाब! अशाप्रकारे त्यांनी आम्ही सरकार बनवू असेच एकप्रकारे सूचविले आहे.  गेल्या वीस दिवसांपासून सकाळी पत्रकार परिषद घेऊन भाजपवर टीका करणाऱ्या संजय राऊत यांनी आज ट्विट करून भाजपवर निशाना साधला आहे. तसेच त्यांनी सध्याच्या राजकीय परस्थितीवर भाष्य केले आहे. 

भाजपची अग्निपरीक्षा- शनिवारी सकाळी महाराष्ट्राच्या राजकारणाला कलाटणी देणारी घटना घडली. शिवसेना-काँग्रेस-राष्ट्रवादी हे तीन पक्ष एकत्र येऊन सरकार स्थापन करण्याचा दावा करण्याआधीच सकाळी भाजपच्या देवेंद्र फडणवीस यांनी राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांच्या पाठिंब्यावर सरकार स्थापन करीत मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. त्यानंतर अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. या राजकीय घडामोडीनंतर संपूर्ण महाराष्ट्रात राजकीय भूकंप झाला. अजित पवारांनी बंड केल्याने भाजपला सत्ता स्थापन करण्यात यश मिळाले आहे. अजित पवार यांच्यासोबत राष्ट्रवादीचे किती आमदार सोबत आहेत. हे ३० नोव्हेंबर रोजी स्पष्ट होणार असले तरी शिवसेनेच्या मुख्यमंत्रिपदावरच्या दाव्यावर सध्या तरी पाणी पडले आहे.